कुपवाडमध्ये बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्यांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:26 IST2021-05-01T04:26:29+5:302021-05-01T04:26:29+5:30
कुपवाड : शहर परिसरात बेकायदा विदेशी दारूची विक्री करणाऱ्या दोघांना कुपवाड पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली.पोलिसांनी त्याच्या ताब्यातील दारूसाठा ...

कुपवाडमध्ये बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्यांना पकडले
कुपवाड : शहर परिसरात बेकायदा विदेशी दारूची विक्री करणाऱ्या दोघांना कुपवाड पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली.पोलिसांनी त्याच्या ताब्यातील दारूसाठा व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बसवराज राजेंद्र पाटील (वय ३०,रा.लिंगायत गल्ली, कुपवाड) व नितीन रामचंद्र तोडकर (३५, रा.माळी गल्ली, कुपवाड) अशी अटक केलेल्या संशयिताची नावे आहेत.
बसवराज पाटील व नितीन तोडकर हे दोघे शुक्रवारी विदेशी दारूची बेकायदा विक्री करण्यासाठी कुपवाडमध्ये दुचाकीवरुन दारूची वाहतूक करीत होते. ही माहिती सहायक पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांना मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यासह कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी छापा टाकला. यावेळी संशयित बसवराज पाटील व नितीन तोडकर दोघे मिळून दारुची वाहतूक करीत होते. यावेळी त्यांना रंगेहाथ सापडले. पोलिसांनी त्यांच्याजवळील मुद्देमाल जप्त करून अटक केली आहे.