महापालिका क्षेत्रात बेकायदा जुगार, व्हिडिओ गेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:26 IST2021-09-19T04:26:46+5:302021-09-19T04:26:46+5:30

मिरजेत बसस्थानक, रेल्वेस्थानक परिसरात कॅसिनो जुगार अड्ड्यावर चालक व त्यांचे साथीदार हाणामाऱ्या करीत आहेत. मात्र यावर काहीही ...

Illegal gambling, video games in the municipal area | महापालिका क्षेत्रात बेकायदा जुगार, व्हिडिओ गेम

महापालिका क्षेत्रात बेकायदा जुगार, व्हिडिओ गेम

मिरजेत बसस्थानक, रेल्वेस्थानक परिसरात कॅसिनो जुगार अड्ड्यावर चालक व त्यांचे साथीदार हाणामाऱ्या करीत आहेत. मात्र यावर काहीही कारवाई होत नाही. मनोरंजनाचा परवाना घेऊन ९० टक्के कॅसिनो, व्हिडिओ गेममध्ये पैसे लावून जुगार सुरू आहे. अनेक कॅसिनो व्हिडिओ गेम विनापरवाना सुरू आहेत. याबाबत अनेकवेळा तक्रारी करूनही कारवाई झालेली नाही. मिरज रेल्वे स्थानक परिसरात व्हिडिओ कॅसिनो गेमचालक व खेळणाऱ्या ग्राहकांची वारंवार भांडणे सुरू आहेत. कॅसिनो जुगारामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जुगारावर कारवाई होते; मात्र मिरजेत दुर्लक्ष सुरू असून, प्रशासनाने या अवैध व्यवसायांवर कारवाई करावी. पोलीस व शासनातर्फे जिल्हा न्यायालयात कॅसिनो व व्हिडिओ गेमच्याविरोधात ३२ वेगवेगळे अपील व प्रकरणे दाखल करण्यात आली होती. त्यावर जिल्हा न्यायालयाने जुगार व मुंबई पोलीस कायद्यानुसार कॅसिनो व व्हिडिओ गेमवर कारवाईचे अधिकार पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार या अवैध व्यवसायावर कारवाईची मागणी जिल्हा संघर्ष समितीचे तानाजी रुईकर, रवींद्र चव्हाण, ॲड. इर्शाद पालेगार, ओंकार वांगीकर, ॲड. श्रीकृष्ण पोतकुळे, ॲड. दीपक नांगरे-पाटील, ॲड. विनय पाटील, गोरख वनखंडे, आसिफ मुजावर, संतोष कदम यांनी निवेदनात केली आहे.

Web Title: Illegal gambling, video games in the municipal area