कृषी-विजय उद्यान पालिकेकडून दुर्लक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:09 IST2020-12-05T05:09:05+5:302020-12-05T05:09:05+5:30
इस्लामपूर : तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीने सांगली-इस्लामपूूर रस्त्यालगत लाखो रुपये खर्च करून कृषी-विजय उद्यान उभे केले आहे. याकडे पालिका प्रशासनाने ...

कृषी-विजय उद्यान पालिकेकडून दुर्लक्षित
इस्लामपूर : तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीने सांगली-इस्लामपूूर रस्त्यालगत लाखो रुपये खर्च करून कृषी-विजय उद्यान उभे केले आहे. याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने पुतळे, बाग, कारंजे यांची दुरवस्था होत चालली आहे. उरुण-इस्लामपूर शहरात उरुण या भागात शेती करणारे शेतकरी जास्त प्रमाणात आहेत. याच भागातील नगरसेवकांचे वर्चस्व पालिकेवर आहे. माजी नगराध्यक्ष विजय पाटील यांच्या अथक प्रयत्नांनी सांगली-इस्लामपूर रोडलगत कृषी-विजय उद्यान उभे आहे. या उद्यानात शेतकरी, सैनिक, शेतीला उपयोगी पडणारी अवजारे, बैलगाडी, गाय, वासरू, श्वान आदी पुतळे उभा केले आहेत. हे ठिकाण पर्यटन स्थळासारखे बनविले होते; परंतु पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्व पुतळ्यांचा रंग उडाला आहे, तर काही पुतळ्यांना भेगा पडल्या आहेत. पाण्याअभावी झाडे वाळत चालली आहेत. याकडे योग्य वेळेत लक्ष दिले नाही, तर खर्च केलेले लाखो रुपये वाया जातील.
चौकट
याठिकाणी पालिकेकडून केवळ एक महिला कर्मचारी येथे कार्यरत आहे. येथे असलेल्या पाण्याच्या नळाला २४ तास पाणी येत होते. आता केवळ तासभर पाणी येते. त्यामुळे या बगीचाला पाणीपुरवठा कमी पडत आहे. परिणामी उद्यानाची दुरवस्था झाली आहे. इस्लामपूर हायस्कूलच्या भिंतीलगत तयार केलेल्या फूटपाथ लॉनचीही दुरवस्था झाली असून, वेळीच देखभाल-दुरुस्ती न केल्यास भविष्यात ही विकासकामे नष्ट होतील.
फोेटो ०४१२२०२०-आयएसएलएम-इस्लामपूर न्यूज
सांगली-इस्लामपूर रोडलगत कृषी विजय उद्यानामधील सर्व पुतळ्याचा रंग उडाला आहे.