हिम्मत असेल तर वादविवादास सामोरे या !
By Admin | Updated: November 15, 2016 00:34 IST2016-11-14T22:32:49+5:302016-11-15T00:34:56+5:30
उदयनराजेंचे ‘नविआ’ला आव्हान : सातारकरांच्या साक्षीने शाहू कलामंदिरात वादास तयार

हिम्मत असेल तर वादविवादास सामोरे या !
दत्ता पाटील -- तासगाव --तासगाव नगरपालिका निवडणुकीचे चित्र शुक्रवारी स्पष्ट झाले. शनिवारचा मुहूर्त साधून गणेशाच्या साक्षीने भाजप आणि राष्ट्रवादीने प्र्रचाराचा श्रीगणेशा केला. आरोपांच्या ठिणगीने एकहाती वर्चस्वाची खात्री देत, दोन्ही पक्षांकडून प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. काँग्रेसकडूनही लवकर सुरुवात होईल. एकंदरीत प्रचाराच्या सुरुवातीवरुन तासगावचे राजकारण विकासाच्या मुद्द्यावरच फिरणार असल्याचे चित्र आहे.
तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी स्वतंत्र पॅनेल उभा केले आहे. शेकाप, शिवसेनेसह अपक्षांनीही आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तासगावची निवडणूक यावेळी बहुरंगी होत असल्याने निकालाचे अचुक भाकित व्यक्त करणे अशक्य झाले आहे, मात्र सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून पालिकेवर आपलेच एकहाती वर्चस्व राहील, असा डांगोरा पिटण्यास सुरुवात झाली आहे. लढतीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर भाजपकडून शनिवारी सकाळीच खासदार संजयकाका पाटील यांच्या उपस्थितीत प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. भाजपच्या केंद्र आणि राज्यातील सत्तेचा दाखला देत, पालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून केलेल्या विकासकामांचा डांगोरा पिटत भाजपकडून सत्ता काबीज करण्याचा अजेंडा निश्चित केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादीनेही शनिवारी सायंकाळी मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत प्रचाराचा श्रीगणेशा केला. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पश्चात आमदार सुमनताई पाटील आणि त्यांची कन्या स्मिता पाटील या माय-लेकींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीकडून आबांच्या पश्चात होत असलेल्या निवडणुकीला भावनिक किनार देत, भाजपच्या मनमानी कारभारावर टीकेची झोड उठवून सत्ता हस्तगत करण्याचा अजेंडा राष्ट्रवादीकडून निश्चित केल्याचे स्पष्ट झाले आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आघाडीवर असणाऱ्या कॉँग्रेसकडून अद्याप जाहीरपणे प्रचाराचा नारळ फोडण्यात आला नाही. मात्र लवकरच कॉँग्रेसकडूनही जाहीर प्रचाराची यंत्रणा राबवण्यासाठी हालचाली सुरू आहेत. भाजपची सत्ता असताना, पालिकेतील बेलगाम कारभार, अवैद्य धंदे आणि खासदार संजयकाका पाटील यांना टार्गेट ठेवूनच काँग्रेसकडून प्रचाराची यंत्रणा राबवली जाणार असल्याची चर्चा आहे.
सर्वच पक्षांकडून मतदारांना भुलविण्यासाठी विकासाच्या अजेंड्याचा भूलभुलय्या तयार करून पालिकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी यंत्रणा लावली जात आहे. मात्र या विकासाच्या चेहऱ्याआड सर्वच पक्षांकडून आगामी पंधरा दिवसांत विरोधकांची कुंडली उकरुन काढून, कारभाराचा पंचनामाही केला जाणार असल्याचे चित्र प्रचार यंत्रणेवरून दिसून येत आहे. प्रचाराची सुरुवात आरोपांच्या फैरींनी झाली आहे. त्यामुळे प्रचाराचा शेवट कोणत्या पातळीवर जाईल, याचे कुतूहलही मतदारांच्या मनात आहे.
काय असेल पक्षांचा अजेंडा
पालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर आठ महिन्यांच्या काळात भाजपकडून कोट्यवधींची विकास कामे करण्यात आली. केंद्र आणि राज्यातील सत्तेमुळे खासदार संजयकाका पाटील विकासकामे खेचून आणण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामुळेच यावेळीही भाजपला सत्ता द्यावी, याच अजेंड्यावर भाजपची प्रचार यंत्रणा असणार आहे.
राष्ट्रवादी नेत्यांकडून भाजपच्या गुंडगिरी कारभारावर टीका
माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कार्यकालात तासगावात कोट्यवधींच्या विकासकामांना मंजुरी मिळाली. आबांच्या पश्चात पालिकेची पहिलीच निवडणूक होत आहे. भाजपच्या कारभाऱ्यांची ठेकेदारी, गुंडगिरी आणि अवैध धंद्यांवर निशाणा साधत भाजपला सत्तेत असताना अपेक्षित विकास साध्य करण्यात आलेले अपयश, याच अजेंड्यावर राष्ट्रवादीची प्रचार यंत्रणा असणार आहे.