शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

'शक्तिपीठ'च्या मोजणीसाठी गावात याल तर याद राखा, राजू शेट्टींचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 19:44 IST

मणेराजुरी, कवलापूर, माधवनगरला भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद

सांगली : आमची जमीन आम्ही राखण्यासाठी रानात बसायचे का? एकदाच गावात या शेतकऱ्याचे ऐकून घ्या, शेतकऱ्यांचा नकार मिळाल्यानंतर पुन्हा गावात येऊ नका. शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गासाठी जमिनी देणार नाही, असे स्पष्ट सांगितले आहे. तरीही वारंवार गावात मोजणीसाठी अधिकारी का येत आहेत? यापुढे मोजणीसाठी गावात याल तर याद राखा, असा सज्जड इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.राजू शेट्टी यांनी मंगळवारी जिल्ह्यातील मणेराजुरी, अंजनी, कवलापूर, माधवनगर, आणि पद्माळे या गावांना भेटी दिल्या. या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे, किसान सभेचे राज्यध्यक्ष उमेश देशमुख यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.राजू शेट्टी म्हणाले, अदानीने गडचिरोली जिल्ह्यात अडीच हजार एकर जंगल खरेदी केले आहे. त्या ठिकाणचे खनिज थेट त्यांच्या गोव्यातील खाजगी बंदरात पोहोचवण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग केला जात आहे. याशिवाय राष्ट्रीय महामार्गचा प्रतिकिलोमीटर ३५ कोटी रुपयांचा खर्च असताना या मार्गाचा मात्र प्रतिकिलोमीटर खर्च १०७ कोटी कसा? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोजणी बंद पाडल्या आहेत. कुठेही शेतकरी मोजणी होऊ देत नाहीत.काही बुजगावणी उभी करून विरोध नसल्याचे सांगत आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांनीही मोजणीसाठी जास्त आग्रही राहू नये, शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन द्यायची नाही, म्हणून सांगितल्यावर सारखे सारखे गावात येऊ शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, अन्यथा आमच्याशी तुमची गाठ असेल, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी प्रभाकर तोडकर, सुनील पवार, रमेश पवार, शरद पवार, राहुल जमदाडे, सुरेश करगणे, दत्ताजी पाटील, विकास, पाटील, प्रशांत शिंत्रे, धनाजी पाटील, नवीन पाटील, जोतीराम जाधव, घनश्याम नलवडे, भूषण गुरव, विष्णू सावंत, प्रवीण पाटील, अधिक पाटील, मनोहर पाटील, बाळासाहेब पाटील, उमेश एडके, संग्राम पाटील, अरुण सावंत, एकनाथ कोळी, विष्णू पाटील, अमोल पाटील, धनाजी जाधव, भाऊ खाडे, अरुण माळी, राजाराम माळी, अरुण पाटील आदींसह शेतकरी उपस्थित होते.

राज्य आर्थिक अडचणीत तरीही शक्तिपीठ कशाला? : महशे खराडेमहेश खराडे म्हणाले, राज्याच्या अर्थ खात्याने या रस्त्याला विरोध केला आहे. सध्या नऊ लाख ३२ हजार कोटींचे कर्ज आहे. आणखी २० हजार कोटींचे कर्ज काढले जाणार आहे. सध्या रत्नागिरी ते नागपूर महामार्ग असताना पुन्हा शक्तिपीठ महामार्ग करू नये, अन्यथा राज्य दिवाळखोरीत निघेल, असे शासकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तरीही शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांना त्रास दिला जात आहे.