वाळवा-इस्लामपूर बसफेऱ्या पूर्ववत न केल्यास रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:29 IST2021-02-09T04:29:15+5:302021-02-09T04:29:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाळवा : वाळवा येथे हुतात्मा साखर कारखान्यामुळे अनेक उद्योगधंदे उभारले आहेत. शाळा-महाविद्यालय व इतर कारणाने वाळव्याला ...

वाळवा-इस्लामपूर बसफेऱ्या पूर्ववत न केल्यास रास्ता रोको
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळवा : वाळवा येथे हुतात्मा साखर कारखान्यामुळे अनेक उद्योगधंदे उभारले आहेत. शाळा-महाविद्यालय व इतर कारणाने वाळव्याला अनेकांची ये-जा सुरू आहे. परंतु इस्लामपूर एसटी आगाराने इस्लामपूर-वाळवा बसफेऱ्याच बंद केल्या आहेत. त्या पूर्ववत व्हाव्यात यासाठी वाळव्यातील विद्यार्थी, मजूर, नोकरदार, व्यापारी आणि प्रवासी यांच्या वतीने इस्लामपूर आगार व्यवस्थापक शर्मिष्ठा घोलप-पाटील यांना सनी अहिर यांनी निवेदन दिले.
फेऱ्या पूर्ववत करण्यात याव्यात अन्यथा तीव्र आंदोलन, रास्ता रोको किंवा उपोषण करण्यात येईल, असे सनी अहिर यांनी सांगितले.
आगार व्यवस्थापक घोलप-पाटील यांनी तीन-चार दिवसांत बसफेऱ्या वाढविण्याचे आश्वासन दिले. त्या म्हणाल्या की, प्रवासी कमी असल्याने उत्पन्न नाही म्हणून फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. या मार्गावर अवैध वाहतूक जोरात चालते असे दिसून येत आहे. प्रवाशांनी एसटी बसने प्रवास केल्यास बसफेऱ्या बंद कराव्या लागणार नाहीत.