शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

त्यांच्याकडे सातबारा असेल तर माझ्याकडे फेरफार!, अनिल बाबरांचा जयंत पाटलांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 14:03 IST

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुसंस्कारी नेते आहेत. त्यांच्या पक्षात आता बगलबच्च्यांची संख्या वाढली आहे. त्यांनीच हे शब्द जयंतरावांच्या तोंडी घातले असावेत

विटा : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुसंस्कारी नेते आहेत. ते एका मोठ्या नेत्यांचे चिरंजीव आहेत. गेल्या ३० वर्षांपासून माझे व त्यांचे संबंध आहेत. ते स्वत: मंत्री होते, त्यामुळे त्यांच्या तोंडून मंत्री, संत्री असे शब्द येणार नाहीत, याची मला खात्री आहे. त्यांच्या पक्षात आता बगलबच्च्यांची संख्या वाढली आहे. त्यांनीच हे शब्द जयंतरावांच्या तोंडी घातले असावेत; पण त्यांच्याकडे सातबारा असेल तर माझ्याकडे तुमचा फेरफार आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी दिला.येथे सोमवारी माजी मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना, ‘घाबरू नका, मंत्री, संत्री कोणीही होऊ द्या, माझ्याकडे सगळ्यांचा सातबारा आहे,’ असे जयंत पाटील बोलल्याचे आ. बाबर यांना माध्यमातून समजले. त्यावर त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले.आ. बाबर म्हणाले, जी पदे घटनेने दिली आहेत, ती मंत्रिपदे जयंत पाटील यांनी स्वत: भोगलेली आहेत. त्या पदाबद्दल ते या पध्दतीने बोलतील, असे मला वाटत नाही. सध्या त्यांच्या पक्षात काही नवीन विद्वान लोक आले आहेत. त्यांना सत्ता मिळावी, यासाठी त्यांनी जयंतरावांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनीच हे सर्व पसरविले आहे; परंतु मी कुजक्या मनोवृत्तीचा नाही. जयंतरावांसारख्या चांगल्या माणसाच्या तोंडी असे शब्द घालणे हे राजकीयदृष्ट्या शोभनीय नाही. त्यामुळे ज्यांनी हे केले, त्यांनी लक्षात ठेवावे, तुमच्याकडे माझा सातबारा असेल तर माझ्याकडे तुमचा फेरफार आहे.स्वत:च्या पायाखालची वाळू घसरू लागल्याने अशी निर्मिती सुरू आहे; परंतु असे करून निवडणूक जिंकता येत नाही. आता तुम्हाला लोकांनीच घरी पाठवायचे ठरविले असल्याचा टोला आ. बाबर यांनी विटा नगरपालिकेच्या सत्ताधारी गटाला लगावला.

टॅग्स :Sangliसांगली