शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सहल, ग्रुपचे बुकिंग असेल, तर रेल्वे जादा वेळ थांबणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 13:37 IST

सांगली : येथील रेल्वे स्थानकावर बहुतांश रेल्वे गाड्यांना तीन मिनिटांचा थांबा दिला आहे. त्यामुळे सांगलीतून बसणे सोयीचे असतानाही अनेक ...

सांगली : येथील रेल्वे स्थानकावर बहुतांश रेल्वे गाड्यांना तीन मिनिटांचा थांबा दिला आहे. त्यामुळे सांगलीतून बसणे सोयीचे असतानाही अनेक ग्रुपचे लोक मिरजेत किंवा अन्य स्थानकातून गाडी पकडतात. मात्र, वेळापत्रकात कमी वेळ असला तरीही संपूर्ण ग्रुप बसेपर्यंत सांगलीत रेल्वे थांबणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.सांगलीतील एका ग्रुपने त्यांच्या बुकिंगची समस्या पश्चिम महाराष्ट्र रेल्वे प्रवासी ग्रुपचे उमेश शहा यांच्याकडे मांडली. तीन मिनिटांसाठी सांगलीत गाडी थांबणार असेल, तर सर्व ग्रुपला रेल्वेत चढण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही, अशी शंका त्यांनी उपस्थित केली. शहा यांनी याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर रेल्वेने सकारात्मक प्रतिसाद दिला. कितीही लोकांचा ग्रुप असला, तरी त्यांचे सर्व सदस्य रेल्वेत बसेपर्यंत कोणतीही रेल्वे सुटणार नाही, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे शहा यांनी अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले.

सांगलीत ग्रुप बुकिंग शक्यग्रुप सहलीसाठी ५० ते ५०० प्रवाशांचे मोठे ग्रुप देखील सांगली स्थानकावरून आता रेल्वे तिकिटे काढू शकतील. सांगली स्टेशनवरूनच ते गाडीत बसू शकतील. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून सांगली रेल्वे स्टेशनवरून ग्रुप सहलीच्या प्रवाशांना सहकार्य करण्याचे आश्वासन मिळाले आहे.

ग्रुप बुकिंगचे प्रमाण वाढलेउन्हाळी सुट्ट्या सुरू होत असल्याने शाळा कॉलेजच्या सहली, लग्न सोहळे, धार्मिक कार्यासाठी तीर्थस्थळ जाणाऱ्या प्रवाशांचे ग्रुप आतापासून रेल्वे तिकिटांचे बुकिंग करीत आहेत. ५० ते २०० जणांचे ग्रुप तिकिटांचे बुकिंग करीत आहेत.

सांगली सोयीचे, पण तिकीट मिरजेचेसांगली, बुधगाव, कवलापूर, बिसूर, सांगलीवाडी, कसबे डिग्रज, तुंग, आष्टा येथील प्रवाशांना सांगली रेल्वे स्थानक सोयीचे व जवळचे आहे. तरीही सांगलीत अनेक गाड्या तीन मिनिटासाठी थांबत असल्याने ग्रुप बुकिंग करणारे बहुतांश लोक मिरजेतून तिकिट काढत होते. आता त्यांना सांगलीत रेल्वेत बसण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.

ग्रुप सहलीला जाणाऱ्या प्रवाशांनी सांगली रेल्वे स्थानकावरून तिकीट काढावे व बोर्डिंग स्टेशन सांगली टाकावे. अशा ग्रुपच्या सदस्याने स्थानकावर आल्यानंतर स्थानक व्यवस्थापक किंवा कोणत्याही अधिकाऱ्यास ग्रुपबाबत कल्पना दिल्यास त्यांना रेल्वेत बसण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी ग्वाही दिल्याने ग्रुपने जाणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. - उमेश शहा, पश्चिम महाराष्ट्र रेल्वे प्रवासी ग्रुप

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वेpassengerप्रवासी