शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेचे पाणी बंद केल्यास धरणाचे दरवाजे तोडणार, संजय विभूते यांचा इशारा 

By संतोष भिसे | Updated: December 8, 2023 17:57 IST

विटा : कोयनेतील पाणीसाठा आजवर अनेकदा कमी झाला आहे. पण, यापूर्वीच्या साताराच्या कोणत्याही पालकमंत्र्यांनी आडमुठेपणाची भूमिका घेतली नाही. परंतु, ...

विटा : कोयनेतील पाणीसाठा आजवर अनेकदा कमी झाला आहे. पण, यापूर्वीच्या साताराच्या कोणत्याही पालकमंत्र्यांनी आडमुठेपणाची भूमिका घेतली नाही. परंतु, आताचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा का केला आहे ? सांगली जिल्ह्यासाठी सोडण्यात येणारे पाणी सोमवारपासून बंद केल्यास हजारो शेतकऱ्यांसह कोयनेवर जाऊन धरणाचे दरवाजे तोडू, असा इशारा उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी सरकारला दिला.यावेळी एकाच सरकारमध्ये असलेले पालकमंत्री देसाई, खासदार संजय पाटील व आमदार अनिल बाबर यांची मिलीभगत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष ॲड. बाबासाहेब मुळीक यांनी केला. विटा येथे शुक्रवारी राष्ट्रवादी कॉँग्रेस व शिवसेनेची (उबाठा) संयुक्त पत्रकार परिषद झाली. कोयना धरणातूनसांगलीसाठी सोडण्यात येणारे पाणी सोमवार, ११ डिसेंबरपासून बंद हाेणार असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुख विभूते व राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष ॲड. मुळीक यांनी भूमिका मांडली.विभूते म्हणाले, सरकारवर नाराज असलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी कोयना धरणातील पाण्याचा प्रश्न विनाकारण निर्माण केला जात आहे. वास्तविक कोयनेतील पाण्यावर सातारा जिल्ह्यातील जलसिंचन योजना अवलंबून नाहीत. मंत्री देसाई यांना सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा एवढा पुळका असेल तर त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या जिल्ह्यातील जलसिंचन योजना पूर्ण कराव्यात. कृष्णा नदीपात्रात सोडण्यात येणारे पाणी बंद केल्यास शेतकरी स्वत: हातात कुदळ, पाटी, खोरे, टिकाव घेऊन कोयना धरणाचे दरवाजे तोडतील.

राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. बाबासाहेब मुळीक म्हणाले, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत प्रकल्पीय तरतूद कपात करून नव्याने पाणी वापर करण्याबाबत समितीने सुचविलेली पाणी कपात अन्यायकारक आहे. सन १९६८ पासून २०१५ पर्यंत अनेकदा कोयनेतील पाणीसाठा कमी झाला होता. तरीही सांगली जिल्ह्याला कधीही पाणीटंचाई निर्माण झाली नाही. कोणतीही योजना बंद पडली नाही किंवा वीज कपातही करावी लागली नाही. मग, आताच हा प्रश्न का निर्माण झाला आहे. यात मंत्री देसाई, खासदार संजय पाटील व आमदार अनिल बाबर यांची मिलीभगत असून, जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा हस्तक्षेप थांबवावा व शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करावा.या पत्रकार परिषदेस सुशांत देवकर, किसन जानकर, ॲड. संदीप मुळीक, विशाल पाटील, संतोष जाधव, सुवर्णा पाटील, महेश फडतरे, सागर कदम उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीKoyana Damकोयना धरणWaterपाणीShiv Senaशिवसेना