शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

खासगी वाहनांवर ‘पोलिस’ लिहाल तर कारवाई, प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 17:45 IST

सांगली : कर्तव्यावर असताना ‘खाकी’चा रूबाब दाखवणारे काही पोलिस खासगी वाहनांतून फिरताना ‘ पोलिस’ असा फलक गाडीवर लावून फिरताना ...

सांगली : कर्तव्यावर असताना ‘खाकी’चा रूबाब दाखवणारे काही पोलिस खासगी वाहनांतून फिरताना ‘पोलिस’ असा फलक गाडीवर लावून फिरताना दिसतात. परंतु खासगी वाहनातून फिरताना ‘पोलिस’ असल्याचे स्टीकर, प्लेट किंवा बोधचिन्ह लावून फिरता येणार नाही. याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई येथून आदेश देण्यात आला आहे.पोलिस दलाच्या गाडीतून फिरताना पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचा एक वेगळा रूबाब असतो. त्यांना मान, सन्मान मिळतो; परंतु पोलिस कर्तव्यावरून उतरल्यानंतर खासगी जीवनात वावरतानाही पोलिसांना ‘खाकी’ची नशा सोडवणे कठीण जाते. खासगी जीवनातदेखील आपल्याला तोच मान सन्मान मिळावा, अशी अनेकांना अपेक्षा असते. कुटुंबासमवेत किंवा स्वत: खासगी कामानिमित्त गाडीतून जाताना आपल्याला कोणी अडवू नये, कोणीही कागदपत्रांची विचारणा करू नये, असे वाटत असते.

जिल्हा सोडून अन्य जिल्ह्यांत गेल्यानंतर तसेच अन्य राज्यांत गेल्यानंतरही आपण पोलिस असल्यामुळे अडवले जाऊ नये, असे वाटते. त्यामुळे अनेकजण खासगी गाडीवर पोलिस असल्याचे स्टीकर लावतात. काही जण पुढच्या भागात काचेजवळ पोलिस असल्याचा छोटा फलक दिसेल, असा ठेवतात. काही जण गाडीवर थेट बोधचिन्हही वापरतात. परंतु मोटार वाहन अधिनियमानुसार, असे लिहिता येत नाही. याबाबत पूर्वीही परिवहन विभागाने निर्देश दिले आहेत.विकी जाधव नामक तक्रारदाराने राज्यातील सर्व जिल्ह्यांतील पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी खासगी वाहनांवर पोलिस बोधचिन्ह तसेच पोलिस लिहिणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत तक्रार केली. त्यानुसार प्रादेशिक परिवहन विभागाने तक्रारीची दखल घेत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

‘महाराष्ट्र शासन’ लिहिल्यास कारवाईखासगी वाहनांवर पोलिस बोधचिन्ह तसेच पोलिस लिहिता येत नाही. त्याचबरोबर खासगी वाहनांवर ‘महाराष्ट्र शासन’ असेही लिहिता येत नाही. त्यामुळे ‘पोलिस’ आणि ‘शासन’ असे लिहिणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक यांनी कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत.

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिस