शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत गडबड केली तर गाठ पोलिसांशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:21 IST

गेल्या ७ वर्षांपासून पोलिसांच्या रेकॉर्डवर असणाऱ्या वाळवा, शिराळा तालुक्यातील २४२ फाळकूट दादांचा बाजार भरवत, विधानसभा निवडणूक कालावधित गडबड केली तर पोलिसांशी गाठ आहे, असा सज्जड दम पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी भरला. यातील काही गुंडांना पोलिसांचा आवाज दाखवत त्यांनी इतरांच्या नाड्या आवळल्या.

ठळक मुद्देनिवडणुकीत गडबड केली तर गाठ पोलिसांशी२४२ फाळकूट दादांचा आदान—प्रदान कार्यक्रम

इस्लामपूर : गेल्या ७ वर्षांपासून पोलिसांच्या रेकॉर्डवर असणाऱ्या वाळवा, शिराळा तालुक्यातील २४२ फाळकूट दादांचा बाजार भरवत, विधानसभा निवडणूक कालावधित गडबड केली तर पोलिसांशी गाठ आहे, असा सज्जड दम पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी भरला. यातील काही गुंडांना पोलिसांचा आवाज दाखवत त्यांनी इतरांच्या नाड्या आवळल्या.येथील उपअधीक्षक कार्यालयात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या ७ वर्षांपासून विविध गुन्हे करत पोलिसांच्या रेकॉर्डवर राहिलेल्या इस्लामपूरच्या (१४६), आष्टा (४७), कासेगाव (१२), कुरळप (१0), शिराळा (२४), कोकरुड (३) अशा ६ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील २४२ फाळकूट दादांचा आदान—प्रदान कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये मारामारीविरूद्ध व मालमत्तेचे गुन्हे करणाऱ्या संशयितांचा समावेश होता.सुरुल सोसायटी, पेठ, हुबालवाडी, नवेखेड, जुनेखेड ग्रामपंचायत, कोरेगाव ग्रामपंचायत, शिगाव जि. प. निवडणूक, वाळवा जि. प. निवडणूक, मागील विधानसभा निवडणुकीत तांदुळवाडीत झालेली मारामारी, शिराळा तालुक्यात कांदे, चिखलवाडी, अस्वलेवाडी, शिराळे खुर्द या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीवेळी दाखल गुन्ह्यातील संशयितांना पिंगळे यांनी कठोर शब्दात सुनावले.वरील सर्व आरोपींना आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही काळासाठी हद्दपार करण्याच्या हालचाली पोलीस वर्तुळात सुरु आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्या आदेशाने आणि पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली हा आदान—प्रदान उपक्रम झाला.यावेळी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, आष्ट्याचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे, शिराळ्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, कुरळपचे सहायक पोलीस निरीक्षक अरविंद काटे, कासेगावचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, कोकरूडचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम आणि उपअधीक्षक कार्यालयातील वाचक पोलीस उपनिरीक्षक इसाक चौगुले उपस्थित होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली