रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी पुन्हा गुन्हा केल्यास आता मोक्का, तडीपारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:50 IST2021-03-04T04:50:46+5:302021-03-04T04:50:46+5:30

सांगली : यापूर्वी गुन्ह्यात सहभाग आढळलेल्या पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाईस आता पोलिसांनी सुरुवात केली आहे. वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर वचक ...

If the criminals on record commit the crime again, now Mocca, Tadipari | रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी पुन्हा गुन्हा केल्यास आता मोक्का, तडीपारी

रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी पुन्हा गुन्हा केल्यास आता मोक्का, तडीपारी

सांगली : यापूर्वी गुन्ह्यात सहभाग आढळलेल्या पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाईस आता पोलिसांनी सुरुवात केली आहे. वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर वचक बसण्यासाठी आता अशांवर मोक्का, तडीपारीची कडक कारवाई करण्यात येणार आहे.

पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर अधीक्षक मनीषा दुबुले यांनी गुन्हेगारांवर कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार ही कारवाई करण्यात येणार आहे.

शहरातील संजयनगर, सांगली शहर, विश्रामबाग आणि सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोनपेक्षा जास्त गुन्हे असलेल्या आरोपींना मार्गदर्शन करून त्यांचे आदानप्रदान करण्यात आले. खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, मारामारी, विनयभंग, जबरी चोरी असे गंभीर गुन्हे असलेल्या गुन्हेगारांचा यात समावेश होता. यावेळी उपअधीक्षक अजित टिके यांनी मार्गदर्शन करत, गुन्हेगारांनी आता पुन्हा गुन्ह्यात न अडकण्याचे आवाहन केले.

सध्या पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांना पुन्हा गुन्हा केल्यास नेहमीची कारवाई होते. मात्र, आता गुन्हेगारीवर वचक बसण्यासाठी कडक कारवाई करण्यात येणार आहे.

शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारांचे आदानप्रदान झाल्यानंतर त्यांचे रेकॉर्ड अद्ययावत करण्याबरोबरच त्यांच्यावर निरीक्षण ठेवण्याच्याही सूचना यावेळी देण्यात आल्या.

यावेळी उपअधीक्षक अजित टिके यांच्यासह निरीक्षक अनिल तनपुरे, अजय सिंदकर, चंद्रकांत बेदरे, काकासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: If the criminals on record commit the crime again, now Mocca, Tadipari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.