जतमध्ये उद्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा साेहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:40 IST2020-12-16T04:40:52+5:302020-12-16T04:40:52+5:30

जत : जत येथील स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने नव्यानेच बांधण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ, श्री गणेश व श्री नवले ...

Idol Pranapratishtha Sahela tomorrow in Jat | जतमध्ये उद्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा साेहळा

जतमध्ये उद्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा साेहळा

जत : जत येथील स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने नव्यानेच बांधण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ, श्री गणेश व श्री नवले महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि लोकार्पण सोहळा गुरुवार, दि. १७ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त बापूसाहेब पवार यांनी दिली.

यावेळी धोंडोपंत महाराज हिंचगिरी संप्रदाय, जुनोनी मठ व सागर महाराज बोराटे (नातेपुते) यांच्याहस्ते हा कार्यक्रम करण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता सुशांत महाराज वडजल (फलटण) यांचे कीर्तन होईल. दुपारी बारा वाजता फुले वाहण्याचा कार्यक्रम आणि मंदिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. आर. आर. कॉलेजच्या पाठीमागील बाजूस छत्रपती शिवाजी महाराजनगर, जत येथे हा कार्यक्रम होणार आहे. जत शहर व परिसरातील भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बापूसाहेब पवार व श्रीकृष्ण पाटील यांनी केले आहे.

Web Title: Idol Pranapratishtha Sahela tomorrow in Jat