स्वतःतील सुप्त गुणांना ओळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:48 IST2021-02-06T04:48:53+5:302021-02-06T04:48:53+5:30
संजयनगर : विद्यार्थ्यांनी स्वतःतील सुप्त गुणांना ओळखले पाहिजे. ज्ञान संपादन करत असताना कोणत्याही परिस्थितीत संघर्ष करून पुढे जाण्याची जिज्ञासा ...

स्वतःतील सुप्त गुणांना ओळखा
संजयनगर : विद्यार्थ्यांनी स्वतःतील सुप्त गुणांना ओळखले पाहिजे. ज्ञान संपादन करत असताना कोणत्याही परिस्थितीत संघर्ष करून पुढे जाण्याची जिज्ञासा व महत्त्वाकांक्षा बाळगल्यास विद्यार्थी नक्कीच उत्तम यश मिळवू शकतील, असे प्रतिपादन डॉ. सुवर्णा पुरोहित यांनी केले.
सांगली येथील पुरोहित कन्या प्रशालेत वार्षिक गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीमती पुतळाबेन शाह बी.एड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. मरजे होते.
मुख्याध्यापिका श्रद्धा केतकर यांनी प्रास्तविक केले. शालेय स्तरावरील विविध परीक्षांमध्ये उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या विद्यार्थिनींना पारितोषिक देऊन डॉ. पुरोहित यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी पर्यवेक्षक सु. ह. कुलकर्णी, उपमुख्याध्यापक भा. गो. घाडगे, दिलीप संकपाळ, प्रदीप थोरात, मिताली कुलकर्णी आदींनी गुणवत्ता वाचन केले. उपमुख्याध्यापक अनिल मासुले यांनी आभार मानले. अलका जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो-०५दुपटे१५
फोटो ओळ : सांगली येथील पुरोहित कन्या प्रशालेत डॉ. सुवर्णा पुरोहित यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. बी. पी. मरजे, श्रद्धा केतकर, सु. ह. कुलकर्णी, भा. गो. घाडगे आदी उपस्थित होते.