शिक्षक समितीच्या कोविड सेंटरचे काम आदर्शवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST2021-06-09T04:34:37+5:302021-06-09T04:34:37+5:30
सांगली : प्राथमिक शिक्षक समितीच्या न्यू लाइफ कोविड सेंटरमुळे कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. या सेंटरचे काम आदर्शवत ...

शिक्षक समितीच्या कोविड सेंटरचे काम आदर्शवत
सांगली : प्राथमिक शिक्षक समितीच्या न्यू लाइफ कोविड सेंटरमुळे कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. या सेंटरचे काम आदर्शवत आहे, असे प्रतिपादन आ. अरुण लाड यांनी केले.
लाड यांनी कोविड सेंटरला मंगळवारी भेट दिली. यावेळी त्यांच्याकडून माॅनिटर भेट देण्यात आला. जि. प. सदस्य शरद लाड आणि क्रांती कारखान्याचे उपाध्यक्ष उमेश जोशी उपस्थित होते. आतापर्यंत ४० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ९२ वर्षीय रुग्णानेही या सेंटरमध्ये कोरोनावर मात केली आहे. भविष्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी शिक्षक समितीने तयारी केली असल्याचे राजेंद्र कांबळे यांनी सांगितले.
यावेळी शिक्षक नेते विश्वनाथ मिरजकर, डॉ. रविराज कांबळे, डॉ. विक्रम कोळेकर, राज्य कोषाध्यक्ष किरण गायकवाड, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, शिक्षक बँकेचे संचालक तुकाराम गायकवाड, शशिकांत भागवत, श्रेणिक चौगुले, सुरेश नरुटे, विकास चौगुले उपस्थित होते.