बाजीराव पाटील ट्रस्टचे कार्य आदर्शवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:16 IST2021-02-20T05:16:45+5:302021-02-20T05:16:45+5:30

ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक प्रकाश पाटील यांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त ...

Ideal work of Bajirao Patil Trust | बाजीराव पाटील ट्रस्टचे कार्य आदर्शवत

बाजीराव पाटील ट्रस्टचे कार्य आदर्शवत

ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक प्रकाश पाटील यांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त शालेय विद्यार्थिनींना कोरे यांच्या हस्ते ट्रस्टच्या वतीने सायकल वाटप केले. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले या परिसरातील मुलींना शिक्षणासाठी दहा ते वीस किलोमीटर शिक्षणासाठी जावे लागत होते. बाजीराव पाटील यांनी ग्रामीण परिसरातील शिक्षणापासून एक ही मुलगी वंचित राहू नये म्हणून त्यांनी गावातच प्राथमिक ते महाविद्यालयापर्यंतची शैक्षणिक सोय केली. त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील मुलगी सुशिक्षित बनली.

कोरे म्हणाले या ट्रस्टने समाजासाठी सतत कार्यरत राहून शालेय विद्यार्थ्यांना पासून गोरगरीब जनतेसाठी आदर्शवत काम केले. या पुढेही बाजीराव पाटील व त्यांचे चिरंजीव प्रकाश पाटील यांच्या कार्याचा वारसा त्यांचे पुत्र रोहित पाटील यांनी पुढे कयम ठेवावा.

फोटो- ऐतवडे खुर्द येथील शिवराज विद्यालयातील विद्यार्थिनींना सायकल वाटप करताना मा निपून कोरे व शिक्षक वर्ग आणि पालक

Web Title: Ideal work of Bajirao Patil Trust