संतोश नाईक यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:31 IST2021-09-14T04:31:18+5:302021-09-14T04:31:18+5:30
सांगली : मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक विद्यारत्न पुरस्काराने ऐनवाडी, ता. खानापूर येथील अगस्ती ...

संतोश नाईक यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार
सांगली : मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक विद्यारत्न पुरस्काराने ऐनवाडी, ता. खानापूर येथील अगस्ती विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष नाईक यांचा सन्मान केला आहे.
"कोरोनाकाळातील शैक्षणिक व सामाजिक कार्य" कार्याचा विचार करून त्यांना पुरस्कार दिला आहे.
संतोष नाईक हे गेली नऊ वर्षे मुख्याध्यापक व १६ वर्षे अध्यापन कार्य करीत आहेत. शाळा विकास व विद्यार्थी हित डोळ्यांसमोर ठेवून ते कार्य करीत आहेत. त्यानी आपल्या कार्यकाळात सर्व वर्गखोल्यात एल.सी.डी बसवून अध्यापनकार्यात आधुनिकता आणली. कोरोना काळात शाळा बंद असताना ऑनलाईन अध्यापन, विद्यार्थी गृहभेट व पालक विद्यार्थ्यांना आरोग्य मार्गदर्शन यासारखे उपक्रम स्वतः सहभागी होऊन राबविले. त्याचबरोबर विद्यालय व शिवबाराजे फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोनामध्ये कार्य केले आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल नाईक यांचा संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब जाधव, सर्व संस्था पदाधिकारी, शिवबाराजे फाउंडेशनचे संस्थापक तुकाराम नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.