अण्णा भाऊंना भारतरत्न देण्यासाठी लोकसभा अधिवेशनात प्रयत्न करेन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:28 IST2021-01-23T04:28:06+5:302021-01-23T04:28:06+5:30
वाटेगाव : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न देण्यासाठी लोकसभा अधिवेशनात प्रयत्न करेन, असे प्रतिपादन खा. सुप्रिया सुळे ...

अण्णा भाऊंना भारतरत्न देण्यासाठी लोकसभा अधिवेशनात प्रयत्न करेन
वाटेगाव : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न देण्यासाठी लोकसभा अधिवेशनात प्रयत्न करेन, असे प्रतिपादन खा. सुप्रिया सुळे यांनी केले.
वाटेगाव (ता. वाळवा) येथे अण्णा भाऊंच्या जन्मभूमीत मानवहित लोकशाही पक्षाच्या राज्यस्तरीय बैठकीस खासदार सुळे यांनी सदिच्छा भेट दिली. त्यानंतर त्यांनी अण्णा भाऊंच्या शिल्पसृष्टीला भेट देऊन पाहणी केली.
त्या म्हणाल्या की, अण्णा भाऊंना भारतरत्न किताब मिळालाच पाहिजे, त्यासाठी सर्व ते प्रयत्न करेन.
मानवहित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन साठे म्हणाले की, समाजाला न्याय देणाऱ्या लोकांची पक्षाला गरज आहे. त्यासाठी लोकचळवळ उभी करावयाची आहे. यावेळी पक्षाच्या वतीने नूतन ३० ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अण्णा भाऊंच्या स्नुषा सावित्री साठे, प्रतीक पाटील, रवींद्र बर्डे, देवराज पाटील, सभापती शुभांगी पाटील, सरपंच सुरेश साठे, उपसरपंच शुभांगी पाटील, गणेश भगत, राधाकृष्ण साठे, फकिरा साठे, प्रकाश पाटील, संपतराव पाटील उपस्थित होते.
फोटो : वाटेगाव येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास खा. सुप्रिया सुळे यांनी अभिवादन केले. यावेळी सावित्री साठे, सचिन साठे, प्रतीक पाटील, रवींद्र बर्डे, देवराज पाटील, सुरेश साठे उपस्थित होते.