मी मिरजकर फौंडेशनतर्फे ५ हजार वृक्षारोपण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:20 IST2021-06-05T04:20:35+5:302021-06-05T04:20:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मिरज : मी मिरजकर फौंडेशनच्या वतीने पूर्ण मिरज शहरात ५ हजार वृक्षांचे रोपण करण्याच्या उपक्रमास हृदयरोग ...

I will plant 5,000 trees on behalf of Mirajkar Foundation | मी मिरजकर फौंडेशनतर्फे ५ हजार वृक्षारोपण होणार

मी मिरजकर फौंडेशनतर्फे ५ हजार वृक्षारोपण होणार

लोकमत न्यूज नेटवर्क

मिरज : मी मिरजकर फौंडेशनच्या वतीने पूर्ण मिरज शहरात ५ हजार वृक्षांचे रोपण करण्याच्या उपक्रमास हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शिरीष चव्हाण यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या बाजूच्या रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात आले. हा उपक्रम पूर्ण मिरज शहरात वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे फाैंडेशनचे निमंत्रक सुधाकर खाडे यांनी सांगितले.

यावेळी अतिश अग्रवाल, यशवंत इंडस्ट्रीजचे केदार पटवर्धन, मराठा क्रांती मोर्चाचे विलास देसाई, बाळासाहेब शिंदे, डॉ. विकास पाटील, ॲड. शेखर करंदीकर, भाजपचे शीतल पाटोळे, प्रा. संजय पाटील, शेतकरी संघटनेचे महादेव कोरे, रिक्षा संघटनेचे महेश चौगुले, सुधीर गोखले, उमेश कुरणे, अमित वाघमोडे, प्रशांत लोखंडे, नितीन सोनवणे, विशाल कराडे आदी उपस्थित होते.

Web Title: I will plant 5,000 trees on behalf of Mirajkar Foundation