मला कलेक्टर व्हायचंय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:09 IST2020-12-05T05:09:10+5:302020-12-05T05:09:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ढालगाव : नागज (ता. कवठेमहांकाळ) येथील दिव्यांग विद्यार्थिनीला कलेक्टर व्हायचे आहे. जागतिक दिव्यांग सप्ताहानिमित्त आदर्श प्रशालेत ...

I want to be a collector ... | मला कलेक्टर व्हायचंय...

मला कलेक्टर व्हायचंय...

लोकमत न्यूज नेटवर्क

ढालगाव : नागज (ता. कवठेमहांकाळ) येथील दिव्यांग विद्यार्थिनीला कलेक्टर व्हायचे आहे. जागतिक दिव्यांग सप्ताहानिमित्त आदर्श प्रशालेत प्राजक्ता चंद्रकांत सुतार या दिव्यांग विद्यार्थिनीशी तालुका विस्तार अधिकारी विश्वास साबळे यांनी संवाद साधला.

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त नागज येथे तालुका विस्तार अधिकारी विश्वास साबळे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांशी गप्पा मारत असताना प्राजक्ता सुतार ही विद्यार्थिनी ‘मला कलेक्टर व्हायचं आहे’ असे म्हणाली. या तिच्या शब्दांनी विस्तार अधिकारी साबळे भारावून गेले. तुझं ध्येय उत्तम आहे; त्यासाठी प्रयत्नशील राहा’, हे समजावून सांगतानाच ‘तू एकटी नाहीस, आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत. तुला कोणतीही अडचण येऊ दे, आम्हाला सांग, आम्ही तुझ्या मदतीला धावून येऊ’ हेही तिला जाणवून दिले. तिच्या प्रत्येक शब्दात आत्मविश्वास दिसला. खरं तर तो जागृत करणं हाच उद्देश होता भेटीचा. याप्रसंगी मुलीचे पालक चंद्रकांत सुतार, बहीण प्रेरणा सुतार, ज्येष्ठ शिक्षक विजय पाटील, अशोक माळी, मारूती शिंदे, विशेष तज्ज्ञ समग्र शिक्षा अभियान मनोहर सलगरे हे उपस्थित होते.

दिव्यांग सप्ताहानिमित्त विविध स्पर्धा घेण्याचे आवाहन तालुका पंचायत समितीचे विस्तार अधिकारी साबळे यांनी केले.

फाेटाे : ०४ ढालगाव १

Web Title: I want to be a collector ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.