शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

'जयंत पाटील यांचा 'कार्यक्रम' करण्याची ऑफर भाजपाने दिली होती'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 17:02 IST

जयंत पाटील यांच्याविरोधात उमेदवारी देण्याची ऑफर भाजपच्या एका मोठ्या नेत्याने मला दिली होती. मात्र आमदारकी, मंत्रिपद मिळविण्यासाठी आपण कधीही राजारामबापूंच्या घराण्याशी गद्दारी करणार नाही, अशी भूमिका जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी गुरुवारी स्पष्ट केली.

ठळक मुद्देजयंतरावांविरोधात मला भाजपची आॅफरगद्दारी करण्याचे कृत्य माझ्याकडून होणार नाही, आॅफर धुडकावली

सांगली : जयंत पाटील यांच्याविरोधात उमेदवारी देण्याची ऑफर भाजपच्या एका मोठ्या नेत्याने मला दिली होती. मात्र आमदारकी, मंत्रीपद मिळविण्यासाठी आपण कधीही राजारामबापूंच्या घराण्याशी गद्दारी करणार नाही, अशी भूमिका जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी गुरुवारी स्पष्ट केली.लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ गुरुवारी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात झाला. यावेळी दिलीपतात्या पाटील यांनी गौप्यस्फोट करताना, भाजपच्या ऑफरची माहिती भाजप नेत्यांच्या उपस्थितीतच दिली. ते म्हणाले की, भाजपच्या एका मोठ्या नेत्याने मला ऑफर देताना मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्याविषयी सांगितले होते. ही ऑफर केवळ पक्षप्रवेशापुरती नव्हती, तर जयंत पाटील यांच्याविरोधात मला उभे करून जयंत पाटील यांचा कार्यक्रम करण्यापर्यंतची होती. ही ऑफर मी धुडकावली. राजारामबापूंनी मला मानसपुत्र मानले होते. संपूर्ण राज्यात माझी आजही तशीच ओळख आहे. आमदारकी, मंत्रीपदे मिळविण्यापेक्षा राजारामबापूंचा मानसपुत्र ही पदवी माझ्यासाठी महत्त्वाची आहे.राजारामबापूंच्या प्रेमापोटी आम्ही त्यांच्या पश्चात जयंत पाटील यांना राजकारणात आणले. त्यांना साथ देत आजपर्यंतचा प्रवास केला. क्षमता असूनही मला पदे मिळाली नसली तरी, त्याचे दु:ख वाटत नाही. वाळव्यातून सांगलीपर्यंतच्याराजकारणात येईपर्यंत मला चाळीस वर्षांचा काळ लागला. राजकारणात हा विलंब खूप मोठा आहे. तरीही त्याबद्दल मला खंत वाटत नाही. पद मिळविण्यासाठी बापूंच्या वारसांसोबत गद्दारी करण्याचे कृत्य माझ्याकडून होणार नाही, अशा शब्दातच मी ती आॅफर धुडकावली. राजारामबापूंसारखा मोठ्या मनाचा माणूस मी अन्यत्र पाहिला नाही. त्यांनी माझ्यासारख्या प्राथमिक शिक्षकाच्या मुलाला राजकारणात आणून राज्यात, देशात आणि परदेशातही फिरविले. माझ्या आयुष्यात घडलेल्या सर्व चांगल्या गोष्टींमागे राजारामबापूंचे ऋण आहेत, असे ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली