शिक्षक बँकेतील विरोधकांचा खोटारडेपणा उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:28 IST2021-09-19T04:28:01+5:302021-09-19T04:28:01+5:30

सांगली : शिक्षक बँकेच्या २०२९-२०२० मधील लाभांश रकमेबाबत विरोधकांचा खोटारडेपणा उघड झाला आहे. आता हिंमत असेल, तर विरोधकांनी राजीनामा ...

The hypocrisy of the opponents in the teacher bank exposed | शिक्षक बँकेतील विरोधकांचा खोटारडेपणा उघड

शिक्षक बँकेतील विरोधकांचा खोटारडेपणा उघड

सांगली : शिक्षक बँकेच्या २०२९-२०२० मधील लाभांश रकमेबाबत विरोधकांचा खोटारडेपणा उघड झाला आहे. आता हिंमत असेल, तर विरोधकांनी राजीनामा देण्याची तयारी ठेवावी, असे आव्हान बँकेचे अध्यक्ष यू.टी. जाधव यांनी दिले.

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी होत आहे. या पार्श्वभूमीवर गतवर्षीच्या लाभांश रकमेवरून सत्ताधारी-विरोधकांत जुंपली आहे.

जाधव म्हणाले की, २०२९-२०२० मधील लाभांश रक्कम रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकान्वये भांडवली खाती जमा करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. तरीही विरोधी संचालकांनी इतर बँकांनी लाभांश रक्कम भांडवली खाती जमा केली नसल्याची सांगत, जाणूनबुजून सभासदांमध्ये खोटी माहिती पसरविली. सातारा शिक्षक बँकेचे अध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता, त्यांनी लाभांश रक्कम भांडवली खाती जमा

करणार असल्याचे सांगितले. विरोधकांना याबाबतचे पुरावे द्यावयास तयार आहोत. धडधडीत खोट बोलून माझा राजीनामा मागणाऱ्या विरोधी संचालकांचे पितळ सभासदांसमोर उघडे पडले आहे. त्यामुळे विरोधी संचालक विनायक शिंदे व अविनाश गुरव यांनी सभासदांचा दिशाभूल केल्याबद्दल जाहीर माफी मागावी, तसेच हिंमत असेल, तर राजीनामा देण्याचे धाडस दाखवावे, असेही जाधव म्हणाले.

Web Title: The hypocrisy of the opponents in the teacher bank exposed