तानंगमध्ये पती, पत्नीला मारहाण प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:19 IST2021-06-18T04:19:52+5:302021-06-18T04:19:52+5:30

कुपवाड : तानंग (ता.मिरज) येेथे म्हैस विक्रीच्या कारणातून आनंदी लालासाहेब पाटील व लालासाहेब विनायक पाटील (दोघेही रा. खरशिंग ता. ...

Husband, wife assault case in Tanang | तानंगमध्ये पती, पत्नीला मारहाण प्रकरण

तानंगमध्ये पती, पत्नीला मारहाण प्रकरण

कुपवाड : तानंग (ता.मिरज) येेथे म्हैस विक्रीच्या कारणातून आनंदी लालासाहेब पाटील व लालासाहेब विनायक पाटील (दोघेही रा. खरशिंग ता. कवठेमहांकाळ) यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी संशयित खंडेराव बापूसाहेब कदम व मनीषा खंडेराव कदम (दोघेही रा.तानंग) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आनंदी पाटील व त्यांचे पती हे दोघेजण गुरुवारी दुपारी तानंगमधील कदम मळ्यात आले होते. त्यांनी संशयित खंडेराव कदम यांना विचारले की, ' मी वडिलांना घेऊन दिलेली म्हैस तू का विकलीस’, असे म्हणताच, ‘तू इथे का आलीस,’ असे म्हणून सळईने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मध्यस्थी करायला आलेल्या लालासाहेब पाटील यांनाही संशयित खंडेराव व त्यांची पत्नी मनीषा या दोघांनी बेदम मारहाण करून जखमी केले आहे. अशी तक्रार पाटील यांनी कुपवाड पोलिसात दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित कदम पती, पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Husband, wife assault case in Tanang