शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: पत्नी नांदत नसल्याने पतीचे शोले स्टाइल आंदोलन; वायरलेस टॉवरवर चढला, पोलिस कोठडीत रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 17:03 IST

आपल्या मागणीकडे पोलिसांनी लक्ष द्यावे म्हणून त्याने पोलिस ठाण्याच्या आवारातील वायरलेस टॉवरवर चढून आंदोलनच केले

जत : पत्नी नांदायला येत नाही म्हणून कर्नाटकातील पतीने जत पोलिस ठाण्याच्या वायरलेस टॉवरवर चढून शोले स्टाइलने आंदोलन केले. ही घटना जत पोलिस ठाण्यासमोर सोमवारी घडली.चांदसाब आदमसाव शिवनगी (वय ३५) हा मूळचा कर्नाटकातील हिंचगिरी (ता. इंडी, जि. विजापूर) येथील आहे. जत तालुक्यातील गिरगाव ही त्याची सासुरवाडी आहे. इंडी येथे तो पत्नी व चार मुलांसह राहतो. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून काैटुंबिक वादाच्या कारणातून पत्नी माहेरी निघून गेली आहे. सासरचे लोक पत्नीला पाठवत नसल्याने चांदसाब याने उमदी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार केली होती. तेथे दखल न घेतल्याने सोमवारी त्याने जत पोलिस ठाणे गाठत दाद मागितली.आपल्या मागणीकडे पोलिसांनी लक्ष द्यावे म्हणून त्याने पोलिस ठाण्याच्या आवारातील वायरलेस टॉवरवर चढून आंदोलनच केले. ‘पत्नी माझ्यासोबत येत नाही तिच्यावर गुन्हा दाखल करून तिला अटक करा, अशी मागणी त्याने लावून धरली.या प्रकारामुळे पोलिसांची मोठी धावपळ उडाली. मोठ्या शिताफीने पोलिसांनी त्याला खाली उतरवले. यानंतर त्याच्यावर कारवाई करत गुन्हा दाखल केला. यानंतर जत न्यायालयात हजर केले असता त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी