पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:50 IST2021-02-21T04:50:48+5:302021-02-21T04:50:48+5:30

सांगली : पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हणमंत भगवान सुतार (रा. पाचवी गल्ली, हनुमाननगर, ...

Husband charged with inciting wife to commit suicide | पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा

पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा

सांगली : पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हणमंत भगवान सुतार (रा. पाचवी गल्ली, हनुमाननगर, सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव असून, याप्रकरणी त्याची सासू शकुंतला महादेव सुतार (रा. येळनिंबर्गी, ता. दक्षिण सोलापूर) यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी शकुंतला सुतार यांची मुलगी अश्विनी हिचा हणमंत सुतार याच्यासोबत विवाह झाला होता. संशयित सुतार पत्नी अश्‍विनीला मुलीच्या औषधोपचारासाठी माहेरुन पैसे आणावेत, यासाठी वारंवार छळ करीत होता. पतीच्या या त्रासाला कंटाळून अश्‍विनीने २९ जानेवारीरोजी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. शनिवारी शकुंतला सुतार यांनी हणमंत याच्याविरोधात मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

Web Title: Husband charged with inciting wife to commit suicide