कुपवाडमध्ये पतीची पत्नीस बॅटने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:33 IST2021-04-30T04:33:51+5:302021-04-30T04:33:51+5:30
कुपवाड : कुपवाड शहरातील अहिल्यानगरमधील कोमल राहुल जाधव (वय २१) यांना पतीनेे बॅटने मारहाण केली. ही घटना बुधवारी उघडकीस ...

कुपवाडमध्ये पतीची पत्नीस बॅटने मारहाण
कुपवाड : कुपवाड शहरातील अहिल्यानगरमधील कोमल राहुल जाधव (वय २१) यांना पतीनेे बॅटने मारहाण केली. ही घटना बुधवारी उघडकीस आली. जखमीवर सांगलीतील वसंतदादा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे. संशयित राहुल बाळासाहेब जाधव (२८) याच्या विरोधात कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित राहुल जाधव हा पत्नी व कुटुंबासह राहताे. मंगळवारी सायंकाळी राहुल याने पत्नी कोमल हिला 'तू स्वयंपाक का केला नाहीस, मला भूक लागली आहे', असे म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर ‘तुला जिवंत ठेवत नाही' असे म्हणून घरातील लाकडी बॅटने मारहाण केली.
या मारहाणीत कोमल जखमी झाली. ही माहिती मिळताच नातेवाइकांनी कोमलला जखमी अवस्थेत सांगलीतील वसंतदादा रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमी कोमल हिने पती राहुल याच्या विरोधात कुपवाड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी राहुल याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपास करीत आहेत.