इस्लामपुरात पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:32 IST2021-09-09T04:32:52+5:302021-09-09T04:32:52+5:30

जितेंद्र पवार लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : घरगुती वादातून पत्नीला वीट आणि लाकडी लाटण्याने मारहाण करत गंभीर जखमी करण्यात ...

Husband beaten for beating wife in Islampur | इस्लामपुरात पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीस कोठडी

इस्लामपुरात पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीस कोठडी

जितेंद्र पवार

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : घरगुती वादातून पत्नीला वीट आणि लाकडी लाटण्याने मारहाण करत गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना शहरातील उर्दू शाळेच्या पाठीमागे घडली. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. येथील न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ही घटना ६ सप्टेंबरला घडली.

याबाबत जखमी शिवानी जितेंद्र पवार (२६, रा. उर्दू शाळेच्या पाठीमागे) असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार जितेंद्र सतीश पवार आणि सासू कुसुम सतीश पवार या दोघांविरुद्ध गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास घरगुती वादातून सासू कुसुम हिने सून शिवानी यांना लाटण्याने मारहाण केली. या वेळी शिवानी यांनी पती जितेंद्र यांच्याकडे मदत मागितली, तेव्हा त्यानेही बाथरूममध्ये पडलेली वीट घेऊन पत्नीला मारहाण करत गंभीर दुखापत केली. घटनेनंतर पोलिसांनी जितेंद्र पवार याला अटक केली आहे. महिला पोलीस हवालदार रुपाली सुतार अधिक तपास करत आहेत.

Web Title: Husband beaten for beating wife in Islampur