शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : अनैतिक संबंधातून तरुणाचा खून करणाऱ्या पती-पत्नीला जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 14:19 IST

आरोपी संजयची पत्नी व मयत सखाराम जाधवर यांच्यात अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून चिडून त्याने पत्नीची मदत घेत त्याच्या खुनाचा कट रचला होता. खोची बंधाऱ्याजवळ मृत सखाराम याला बोलावून घेत रोहित माळी याच्या मदतीने वार करून त्याचा खून करण्यात आला होता.

सांगली : अनैतिक संबंधाच्या संशयावरून मुंडके व धड वेगवेगळे करून तरुणाचा खून केल्याप्रकरणी पती-पत्नीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. संजय उद्धव जाधवर व उमा संजय जाधवर (दोघेही रा. काशीदवाडी, ता. केज, जि. बीड) असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. राजंदेकर यांनी हा निकाल दिला.खटल्याची माहिती अशी की, ९ मार्च २०१३ रोजी ही घटना उघडकीस आली होती. नरंदे (ता. हातकणंगले) येथील साखर कारखान्यावर मजूर म्हणून आरोपी आले होते. यावेळी आरोपी संजयची पत्नी व मयत सखाराम जाधवर यांच्यात अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून चिडून त्याने पत्नीची मदत घेत त्याच्या खुनाचा कट रचला होता. खोची बंधाऱ्याजवळ मृत सखाराम याला बोलावून घेत रोहित माळी याच्या मदतीने वार करून त्याचा खून करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी संजय जाधवर याने सखारामचे मुंडके व धड वेगवेगळे करून खोची बंधाऱ्यात टाकून दिले होते. यातील धड तरंगत समडोळी येथे आले होते. त्यावेळी नदीजवळ मोटार चालू करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थाला हे धड दिसून आले होते.त्यानंतर सांगली ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपींवर दोषारोपपत्र दाखल केले हाेते. सरकार पक्षातर्फे २१ साक्षीदार तपासण्यात आले. यात तपासकामी सागर पाटील व उपअधीक्षक बजरंग बनसोडे यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. सबळ पुराव्याआधारे दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनाविण्यात आली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील मकरंद ग्रामोपाध्ये यांनी काम पाहिले. त्यांना जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी