रेठरेधरणला पती-पत्नीस मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:27 IST2021-04-01T04:27:48+5:302021-04-01T04:27:48+5:30

इस्लामपूर : रेठरेधरण (ता. वाळवा) येथे शेतजमिनीच्या वाटणीवरून असलेल्या वादातून माजी सैनिक व त्याच्या पत्नीने चुलता, चुलतीस लाकडी दांडक्याने ...

Husband and wife beaten by Rethredharan | रेठरेधरणला पती-पत्नीस मारहाण

रेठरेधरणला पती-पत्नीस मारहाण

इस्लामपूर : रेठरेधरण (ता. वाळवा) येथे शेतजमिनीच्या वाटणीवरून असलेल्या वादातून माजी सैनिक व त्याच्या पत्नीने चुलता, चुलतीस लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. हा प्रकार मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडला.

याबाबत विजय बापूसाहेब देशमुख (वय ६५) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. या मारहाणीत त्यांच्यासह पत्नी सुनीता विजय देशमुख जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी भगतसिंग शिवाजीराव देशमुख आणि सुषमा भगतसिंग देशमुख या दोघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या दोन्ही कुुटुंबात जमिनीच्या वाटणीचा दावा न्यायालयात प्रलंबित आहे. या दाव्याची मंगळवारी सुनावणी होती. विजय देशमुख हे आपल्या पत्नीसह घरी असताना रात्रीच्या सुमारास भगतसिंग आणि त्याच्या पत्नीने शिवीगाळ का करता, असे म्हणत मारहाण केल्याचे म्हटले आहे. पोलीस हवालदार श्रीकांत अभंगे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Husband and wife beaten by Rethredharan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.