इस्लामपुरात पती-पत्नीला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:30 IST2021-03-01T04:30:36+5:302021-03-01T04:30:36+5:30

इस्लामपूर : येथील मंत्री कॉलनी परिसरात किरकोळ कारणातून दोघांनी लाकडी बॅट आणि दगडाने मारहाण करून पती-पत्नीला जखमी केल्याची घटना ...

Husband and wife beaten in Islampur | इस्लामपुरात पती-पत्नीला मारहाण

इस्लामपुरात पती-पत्नीला मारहाण

इस्लामपूर : येथील मंत्री कॉलनी परिसरात किरकोळ कारणातून दोघांनी लाकडी बॅट आणि दगडाने मारहाण करून पती-पत्नीला जखमी केल्याची घटना घडली. हा प्रकार शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडला. यातील दोघा संशयितांना पोेलिसांनी अटक केली असून न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

नवनाथ कांबळे व राहुल माने अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत अनिल गुलाब भारती (वय ४०) याने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्याच्यासह पत्नी शीला ही या मारहाणीत जखमी झाली आहे.

अनिल भारती हा गवंडी काम करणारा मजूर असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील आहे. मंत्री कॉलनीत भाड्याने खोली घेऊन तो कुटुंबासह राहतो. त्याच्या शेजारी नवनाथ कांबळे हा राहत होता. खोली मालकांनी कांबळे याला खोली सोडण्यास सांगितले. अनिल भारती यानेच मालकाला सांगून आपल्याला खोली सोेडायला लावली,या रागातून कांबळे व माने यांनी भारती पती-पत्नीला मारहाण करून जखमी केले. सहायक पोलीस फौजदार बळीराम घुले अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Husband and wife beaten in Islampur