धनगावमध्ये पत्नीचा खून करुन पती फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:27 IST2021-09-19T04:27:06+5:302021-09-19T04:27:06+5:30

भिलवडी : पलूस तालुक्यातील बुरुंगवाडी ते धनगावदरम्यान शिवारात लाकूडतोड करून कोळसा बनविणाऱ्या आदिवासी कुटुंबातील कांताबाई गणपत पवार (वय ४५, ...

Husband absconds after killing wife in Dhangaon | धनगावमध्ये पत्नीचा खून करुन पती फरार

धनगावमध्ये पत्नीचा खून करुन पती फरार

भिलवडी : पलूस तालुक्यातील बुरुंगवाडी ते धनगावदरम्यान शिवारात लाकूडतोड करून कोळसा बनविणाऱ्या आदिवासी कुटुंबातील कांताबाई गणपत पवार (वय ४५, मूळगाव सडोली, ता. मावळ, जि. पुणे) हिचा खून करून पती गणपत पवार (वय ५०) फरार झाला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून हा प्रकार घडला. गणपतने काठीने बेदम मारहाण केल्याने कांताबाईचा मृत्यू झाला. याबाबत नवनाथ गोवर्धन राठोड यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गणपत पवार व त्याची पत्नी कांताबाई पवार हे दाेघेही धनगाव-बुरूंगवाडीदरम्यान सदाशिव चव्हाण यांच्या पडीक शेतात लाकूडतोड करून कोळसा बनविण्याचे काम करत होते. त्यांच्या आसपास काही अंतरावर इतर कामगारांच्याही झोपड्या आहेत. शुक्रवार, दि. १७ सप्टेंबर रोजी पती-पत्नी जुळेवाडी (ता. तासगाव) येथे बाजार करण्यास गेले होते. बाजार करून रात्री उशिरा ते धनगावला परतले. रात्री दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. यावेळी रागाच्या भरात गणपत पवार याने पत्नी कांताबाई हिला काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत वर्मी मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर संशयित गणपत पवारने तिथून पलायन केले. सकाळी हा प्रकार आसपासच्या कोळसा बनविणाऱ्या आदिवासी कुटुंबातील काही लोकांच्या निदर्शनाला आला. त्यांनी याबाबत स्थानिक ग्रामस्थांमार्फत भिलवडी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला.

भिलवडी पोलिसांनी आसपासच्या गावातील सीसीटीव्हीचे चित्रण तपासले असता, खून करून फरार झालेला संशयित गणपत पवार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे आढळून आले. पाेलीस त्याचा शाेध घेत आहेत.

Web Title: Husband absconds after killing wife in Dhangaon