जत तालुक्यात हुरडा पार्टीचे शेतात आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:23 IST2021-02-08T04:23:07+5:302021-02-08T04:23:07+5:30
संख : जत तालुक्यातील संख परिसरात सध्या शेतांमध्ये हुरडा पाट्र्या जोमात रंगू लागल्या आहेत. शेतकरी आपल्या मित्रांना, राजकीय मंडळींना, ...

जत तालुक्यात हुरडा पार्टीचे शेतात आयोजन
संख : जत तालुक्यातील संख परिसरात सध्या शेतांमध्ये हुरडा पाट्र्या जोमात रंगू लागल्या आहेत. शेतकरी आपल्या मित्रांना, राजकीय मंडळींना, शासकीय अधिकारी, पै-पाहुण्यांना आमंत्रित करून हुरडा खाण्यासाठी बोलवणी करीत आहेत.
परिसरात शेतामध्ये ज्वारीचा, मक्याचा हुरडा भाजून खाण्याचा आस्वाद अनेकजण घेताना दिसत आहेत. पाहुणचार म्हणून रानात हुरड्याच्या शेकोट्या पेटविल्या जातात. हुरडा पार्टी म्हणजे आगळीवेगळी न्याहरी असते. ज्वारीचा हिरवागार हुरडा, मक्याचा हुरडा खाल्ला जातो. हुरड्याबरोबर शेंगदाणे, मीठ, खोबरे, वांग्याची भाजी, मिरची चटणी चविष्टपणे खाण्याची मजाच आगळी असते.
यंदा परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आगाप पेरणी झालेल्या ज्वारी पिकांना मोठा फटका बसला आहे. मात्र मागास पेरणी झालेल्या रब्बी हंगामातील पिकांना अनुकूल हवामानामुळे दिलासा मिळाला आहे. यावर्षी ६२ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. त्यामध्ये ४८ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे. यावर्षी दमदार पाऊस झाल्याने मका पीक मोठ्या प्रमाणात घेतले आहे. ऑक्टोबर महिन्यानंतर पिकांना पोषक हवामान लाभल्याने पिकांची वाढ चांगली झाली आहे.
चाैकट
शरीराला पोषक घटक
हिरवागार ज्वारीचा हुरडा, मक्याचा हुरडा आहारातील सकस अन्न आहे. हुरडा थंडीच्या दिवसात शरीराला पोषक असतो. हुरड्यातून ‘अ’ जीवनसत्त्व मिळते.
फोटो-०७संख१ व २
फोटो ओळ : जत तालुक्यातील संख परिसरात हुरडा पाट्र्या आयोजित केल्या जाऊ लागल्या आहेत.