शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: विट्यात राबताहेत शेकडो परप्रांतीय बालकामगार; प्रशासनाचे दुर्लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 15:58 IST

संबंधित व्यावसायिकांवर कारवाईची मागणी

दिलीप मोहितेविटा : दारिद्र्य आणि सततची भटकंती यामुळे शाळेकडे पाठ फिरवलेल्या परप्रांतीय चिमुकल्यांनी विट्यात आश्रय घेतला आहे. आई-वडिलांनी घेतलेली पैशांची उचल फेडण्यासाठी शेकडो परप्रांतीय बालकामगार राबत आहेत. शहरातील हॉटेल्स, चायनीज खाद्यपदार्थांचे स्टाॅल्स, बांधकाम तसेच भंगार व्यवसायासह अन्यत्र या बालकामगारांचा सर्रास वापर होत आहे.विटा शहरात भंगार व्यवसायात उत्तर प्रदेश, बिहार तर बेकरी व्यवसायात राजस्थान, गुजरात तसेच उडपी आणि सुवर्णालंकार व्यवसायात बंगाली कामगार काम करत आहेत. बांधकाम व्यवसायात कर्नाटकातील बेळगाव परिसरातील अनेक बालकामगार सध्या राबत असल्याचे दिसून येत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी तुटपुंज्या पगारावर तर काही बालकामगार केवळ दोनवेळचे जेवण आणि राहण्याची सोय होत असल्याने काम करत आहेत. अनेक परप्रांतीय व्यावसायिकांनी आपापल्या राज्यातून बालकामगार आणले आहेत. रात्रंदिवस त्यांना कामात जुंपले जाते.या बालकामगारांचे आर्थिक व शारीरिक शोषण होत असतानाही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी आहेत. परप्रांतातून आणताना चिमुरड्यांच्या आई-वडिलांसह अन्य नातेवाईकांच्या हातावर वर्षाकाठी केवळ पाच ते दहा हजार एकरकमी ठेवले जातात. त्यामुळे मालक या कामगारांना खरेदी केल्यासारखी वागणूक देतात.बेकरी व्यवसायातील बालकामगारांना आगीच्या भट्टीसमोर तर सुवर्ण व्यवसायात ॲसिडच्या धुरात काम करावे लागते. भंगार जमा करतानाही लोखंडी साहित्याची वाहतूक करावी लागते.हॉटेल्स व कोल्ड्रिंक्स या व्यवसायातही अनेक बालकामगार राबताना दिसतात. बालकामगारांचा सर्वाधिक वापर बांधकाम व्यवसायात होत असून, या बालकामगारांना उंच मजल्यांवर सिमेंट, वाळू, वीट, खडी अशा जड साहित्याच्या वाहतुकीसाठी वापरले जाते. अशा बालकामगारांचा प्रशासनाने तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

सुटका कोण करणार?अडगळीच्या एका दहा बाय दहाच्या खोलीत १२ ते १५ बालकांची राहण्याची व्यवस्था केली जाते. त्यांना शिक्षण तर नाहीच पण पुरेसे जेवण, विश्रांती व आरोग्य सुविधाही मिळत नाहीत. या बालकामगारांना व्यक्तिगत स्वातंत्र्य नसल्याने त्यांची यातून कोण सुटका करणार? हा प्रश्न आजही अनुत्तरीतच आहे.

टॅग्स :Sangliसांगली