शंभरावर मुलींना काढून दिले सुकन्या योजनेचे खाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:31 IST2021-09-05T04:31:10+5:302021-09-05T04:31:10+5:30

सांगली : अजिंक्यन अँड वूमन फाऊंडेशनतर्फे शंभरहून अधिक मुलींना सुकन्या योजनेअंतर्गत बँक खाती काढून देण्यात आली. त्याचे प्रमाणपत्र वितरण ...

Hundreds of girls removed Sukanya Yojana account | शंभरावर मुलींना काढून दिले सुकन्या योजनेचे खाते

शंभरावर मुलींना काढून दिले सुकन्या योजनेचे खाते

सांगली : अजिंक्यन अँड वूमन फाऊंडेशनतर्फे शंभरहून अधिक मुलींना सुकन्या योजनेअंतर्गत बँक खाती काढून देण्यात आली. त्याचे प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम शनिवारी पार पडला.

मंजिरी गाडगीळ यांच्याहस्ते मुलींना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी गाडगीळ म्हणाल्या की, अजिंक्यन वूमन फाऊंडेशन महिलांसाठी सुरू केलेले एक व्यासपीठ आहे. त्यामध्ये महिला सबलीकरणासाठी काम केले जाते. फाऊंडेशनअंतर्गत ऐशानी अथेंटिक्स म्हणून एक युनिट सुरू केले आहे. त्याच्या माध्यमातून बास्केट क्वीन म्हणून ॲप सुरू केले आहे. त्यातून महिलांनी बनवलेले सर्व ताजे पदार्थ घरोघरी पोहोचविले जातात आणि या महिलांना उद्योग निर्माण करून देण्यात येते. बास्केट क्वीन हे वोकल फॉर लोकल सिस्टिमवर चालते. सांगलीतील सर्व दुकाने यात समाविष्ट केली आहेत.

कार्यक्रमाला आमदार सुधीर गाडगीळ यांनी व प्रकल्पास सहकार्य केल्याचेही मंजिरी गाडगीळ यांनी सांगितले. यावेळी रीटा शहा, वर्षा पोळ, निर्मला शेलार, स्वाती देवल, स्वाती भिडे, विद्या खिलारे, कल्याणी गाडगीळ, मिरज इनरव्हिल क्लबच्या सौ. सारिका प्राणी, केतकी जोशी, डॉ. गीता कदम आदी उपस्थित होते. स्वागत रीटा शहा व आभार कल्याणी गाडगीळ यांनी मानले.

Web Title: Hundreds of girls removed Sukanya Yojana account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.