शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

कृष्णेला मुक्त श्वास घेऊ द्या, नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी सांगलीत मानवी साखळी

By संतोष भिसे | Updated: March 25, 2023 14:03 IST

कृष्णेत मळीयुक्त पाणी मिसळल्याने लाखो माशांचा मृत्यू

सांगली : कृष्णा नदीच्याप्रदूषणमुक्तीसाठी शनिवारी अवघ्या सांगलीकरांनी एकजूट केली. मानवी साखळीद्वारे कृष्णेच्या मूक वेदनांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. तिच्या बेसुमार प्रदूषणावर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रदूषण करणाऱ्या बेजबाबदार सांगलीकरांना साकडे घातले.सकाळी सातपासूनच अनेक सांगलीकरांनी आयर्विन पुलाजवळ गर्दी केली होती. नागरिक विकास मंचने साखळी उपक्रमाचे नेतृत्व केले. विविध संस्था, संघटना, शाळा, व्यापारी, उद्योजक, सामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी सहभागी झाले. हरभट रस्ता, कापड पेठ, गणपती मंदिर व कृष्णा नदी अशी साखळी धरण्यात आली. सहभागी नागरिकांनी कृष्णेच्या प्रदूषणाविरोधातील घोषवाक्यांचे बॅनर्स फडकावले होते. पर्यावरणवादी संस्थांनी प्रदूषणमुक्तीसाठीच्या उपाययोजना फलकाद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला. शाळकरी विद्यार्थ्याच्या हस्ते प्रदूषण नियंत्र मंडळाचे अधिकारी नवनाथ अवताडे यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये म्हंटले आहे की, कृष्णेत मळीयुक्त पाणी मिसळल्याने लाखो माशांचा प्रतिवर्षी मृत्यू होतो. त्याची कारणे आणि प्रदूषणाची केंद्रे वेगवेगळी आहेत, मात्र नदीचे पाणी विष बनत आहे. प्रदूषण अत्यंत गंभीर वळणाकडे जात आहे. कृष्णेची अवस्था पंचगंगा नदीसारखी होऊ नये यासाठी उपाययोजनांची आवश्यकता आहे.उपक्रमात विद्यार्थी, महिला, फेरीवाले, रिक्षावाले, हमाल, माथाडी, बांधकाम कामगार हेदेखील सहभागी झाले. संयोजन पृथ्वीराज पवार, सतीश साखळकर आदींनी केले.आंदोलकांनी कृष्णा प्रदूषण मुक्त होण्यासाठी सुचविलेली उपाय असे...

  • उगमापासून राजापूर बंधाऱ्यापर्यंत सर्वेक्षण करा. तज्ज्ञ समितीद्वारे प्रदूषणकारी घटक निश्‍चित करा.
  • कृष्णा-वारणाकाठावरील साखर कारखान्यांनी रसायनयुक्त पाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभे करावेत, मगच त्यांना गाळप परवाना द्यावा.
  • औद्योगिक क्षेत्रालाही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सक्तीचे करा, उभारणीसाठी कालमर्यादा निश्‍चित करा.
  • नदीकाठावरील २९ गावे, तीन नगरपालिका, सांगली महापालिकेचे सांडपाणी प्रक्रियेनंतरच नदीत सोडावे, यासाठी तत्काळ निधी द्या.
  • नदीकाठची शेती अधिकाधिक सेंद्रिय होण्यासाठी जागृती व प्रोत्साहन कार्यक्रम राबवा.

 

टॅग्स :Sangliसांगलीriverनदीpollutionप्रदूषण