स्मशानभूमीत माणुसकीचे दर्शन
By Admin | Updated: September 7, 2016 23:54 IST2016-09-07T23:29:54+5:302016-09-07T23:54:21+5:30
नेवरीत कार्यकर्त्याचा मृत्यू : समाजाकडून मदतीचा ओघ$$्

स्मशानभूमीत माणुसकीचे दर्शन
गणेश पवार ल्ल नेवरी
सामाजिक कार्यकर्त्यांच्या पश्चात समाज त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडतो, हा कटू इतिहास आहे. परंतु कडेगाव तालुक्यातील नेवरी येथील तळमळीच्या कार्यकर्त्याच्या मृत्यूनंतर वेगळाच अनुभव आला. त्याच्या रक्षाविसर्जनासाठी स्मशानभूमीत आलेल्या गावकऱ्यांनी ५० हजारांची रोख मदत त्याच्या कुटुंबियांना देऊन त्याच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्चही उचलला. गावकऱ्यांचा मदतीचा सढळ हात पाहिल्यानंतर, माणुसकी अजूनही जिवंत आहे, याची प्रचिती सर्वांना आली.
कमलाकर देवकर (वय ४३) कडेगाव तालुक्यातील नेवरी येथील हरहुन्नरी तरुण. वडिलांपासून दुरावल्यामुळे आईसमवेत आजोळी राहायचा. दुसऱ्यांचा आधार होण्यासाठी धावून जायचा. पारंपरिक केशकर्तनाचा व्यवसाय असला तरी, त्याचा जास्त वेळ सामाजिक कार्यातच खर्च व्हायचा. साहजिकच कुटुंबाची आर्थिक फरफट नेहमीचीच. राजकारणाचा असो किंवा कुस्त्यांचा फड, कुणाला आजारपणात मदत असो किंवा रानामाळाती लकाम, जिथं कुणाचं काम अडल, तिथं आपण पोहोचायचं आणि प्रत्येक काम तडीस न्यायचं, हा त्याचा स्वभाव. त्याच्या मृत्यूनंतर रक्षाविसर्जनासाठी गावकरी आणि नातेवाईकांनी हजेरी लावली. कमलाकरच्या कुटुंबाला उघड्यावर पडू द्यायचं नाही, असा निश्चय झाला. शोकसभा सुरू असतानाच मदतीचा ओघ सुरू झाला. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि दत्तकुमार खंडागळे यांनी दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनीही या कुटुंबाचे एक वर्षाचे वीज बिल पगारातून भरण्याचे जाहीर केले.
पुण्याई फळाला आली
कमलाकर देवकर यांचे रविवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्याची आई, पत्नी आणि दोन मुले यांचे काय होणार, याचं नातेवाईकांना कोडं पडलं होतं. पोराबाळांना वनवासी करून गेल्याची खंत काही वृध्द बोलून दाखवत होते. मात्र, कमलाकरने केलेली पुण्याई फळाला आली.