हुबळी-कुर्ला एक्स्प्रेस आता दररोज

By Admin | Updated: August 31, 2014 00:14 IST2014-08-31T00:10:17+5:302014-08-31T00:14:49+5:30

प्रवाशांकडून स्वागत : मिरजेतून मुंबईला जाण्याची सोय

Hubli-Kurla Express now everyday | हुबळी-कुर्ला एक्स्प्रेस आता दररोज

हुबळी-कुर्ला एक्स्प्रेस आता दररोज

मिरज : हुबळी-कुर्ला एक्स्प्रेस आता १ सप्टेंबरपासून दररोज धावणार आहे. यामुळे मिरजेतून मुंबईला जाण्यासाठी नवीन एक्स्प्रेस उपलब्ध होणार आहे.
हुबळी-मिरज-कुर्ला ही दर सोमवारी धावणारी साप्ताहिक एक्स्प्रेस आता दररोज धावणार आहे. मिरजेतून दररोज रात्री ९.१० वाजता सुटणारी एक्स्प्रेस सकाळी ७ वाजता कुर्ल्यात पोहोचणार आहे. कुर्ल्यातून सकाळी दहा वाजता सुटणारी कुर्ला -हुबळी एक्स्प्रेस पुण्यात दुपारी एक वाजता व मिरजेत रात्री आठ वाजता पोहोचणार आहे. १७३१८७ व १७३१८ असा नवीन एक्स्प्रेसचा क्रमांक असून पुढील महिन्यापासून हुबळी कुर्ला एक्स्प्रेस सुरू होत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. कोल्हापूर-सोलापूर एक्स्प्रेसची मध्यरात्रीची प्रवाशांच्या गैरसोयीची वेळ बदलण्यात येणार असून ही एक्स्प्रेस १५ सप्टेंबरपासून पूर्ववत सकाळी दहा वाजता मिरजेतून सोलापूरला जाणार असल्याचे सांगण्यात आले. या रेल्वेमुळे आता मिरजेहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची सोय झाली आहे. यामुळे या निर्णयाचे स्वागत होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Hubli-Kurla Express now everyday