शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेकडून सांगलीकरांना उन्हाळी सुटीची खास भेट; सांगली, पुणे मार्गे हुबळी-अहमदाबाद विशेष गाड्या धावणार

By अविनाश कोळी | Updated: April 23, 2024 16:07 IST

सांगली : उन्हाळ्याच्या सुटीत रेल्वेने सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. हुबळी-अहमदाबाद या विशेष उन्हाळी गाडीला सांगलीत थांबा मंजूर केला ...

सांगली : उन्हाळ्याच्या सुटीत रेल्वेनेसांगलीकरांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. हुबळी-अहमदाबाद या विशेष उन्हाळी गाडीला सांगलीत थांबा मंजूर केला आहे. २८ एप्रिल ते २६ मे या कालावधीत दोन गाड्यांच्या एकूण दहा फेऱ्या होणार आहेत.हुबळी-अहमदाबाद विषेश रेल्वे गाड्या सांगली रेल्वे स्थानकातून अहमदाबाद, वडोदरा, सुरत, वापी, बोईसर, मुंबई-कल्याण, मुंबई-वसई, लोणावळा तसेच पुणे जाण्यासाठी उपयुक्त आहेत, तसेच हुबळी, धारवाड लोंढा बेळगाव इत्यादी ठिकाणातून लोक सांगली रेल्वे स्थानकावर या गाड्यांनी येऊ शकतील.अहमदाबाद-हुबळी विशेष रेल्वे गाड्या पकडून अहमदाबाद, वडोदरा, सुरत, वापी, बोईसर, मुंबई-कल्याण मुंबई-वसई, लोणावळा व पुणे येथून सांगली रेल्वे स्थानकापर्यंत प्रवास करू शकतील, तसेच सांगली स्थानकावरून घटप्रभा, बेळगाव, लोंढा, धारवाड व हुबळीपर्यंत जाऊ शकतील.

प्रत्येक रविवारी धावणार गाडीउन्हाळ्यातील सुट्यांसाठी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी हुबळी-अहमदाबाद दरम्यान सांगली, पुणे मार्गे विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.हुबळी-अहमदाबाद (गाडी क्र. ०७३११) या विषेश रेल्वे गाड्या २८ एप्रिल ते २६ मेपर्यंत प्रत्येक रविवारी रात्री हुबळी येथून सुटून सांगली, पुणे मार्गे अहमदाबादला जातील.

अहमदाबाद-हुबळी प्रत्येक सोमवारी धावणारअहमदाबाद-हुबळी (गाडी क्र. ०७३१२) ही विशेष एक्स्प्रेस २९ एप्रिल ते २७ मेदरम्यान प्रत्येक सोमवारी अहमदाबाद येथून सुटून पुणे, सांगलीमार्गे हुबळीला जाईल.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे