सोलो डान्स स्पर्धेत रितिका बरनवाल व पायल सोनी यांची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:15 IST2021-02-19T04:15:43+5:302021-02-19T04:15:43+5:30
सर्व पालक आणि सहभागी स्पर्धकांनी दिलेल्या नियम आणि अटींचे पालन करून सहकार्य केले. सर्व विजेत्यांना त्यांच्या नृत्य प्रकार, नृत्य ...

सोलो डान्स स्पर्धेत रितिका बरनवाल व पायल सोनी यांची बाजी
सर्व पालक आणि सहभागी स्पर्धकांनी दिलेल्या नियम आणि अटींचे पालन करून सहकार्य केले. सर्व विजेत्यांना त्यांच्या नृत्य प्रकार, नृत्य प्रदर्शन आणि पेहराव यांचे योग्य प्रकारे विश्लेषण करून परीक्षकांकडून गुण देण्यात आले. त्यानुसार विजेत्या झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार अशोक चव्हाण, रवी पवार, रवींद्र साळुंखे, पौर्णिमा जाधव, मानतेश डोडमनी, असीफ शिकलगार आणि परीक्षक संतोष भोसले यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. लवकरच बालचमूंसाठी विविध स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितलॆ आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : प्रशांत -९१६८३६८२७७
चौकट :
लहान गटातील वजेते
प्रथम - रितिका बरनवाल
द्वितीय - समृद्धी शिंदे
तृतीय - स्वरा तारळेकर
उत्तेजनार्थ - सार्थक काळोखे, सृष्टी कांबळे
मोठ्या गटातील विजेते
प्रथम -पायल सोनी
द्वितीय - वृषाली मस्के
तृतीय - यशराज लकडे
उत्तेजनार्थ- कैवल्य कालढोंगे, सानिका काळोखे
चौकट २
या स्पर्धेसाठी नवजीवन मोबाइल्स ॲण्ड स्टेशनरी, विटा हे पार्टनर आहेत. विटा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक, कराड रोड येथे नव्याने सुरू झालेल्या या शॉपमध्ये सर्व शाळा उपयोगी साहित्य, ब्रँडेड पेन, विविध सुगंधी अत्तर, विविध स्टायलिश घड्याळे, उत्तम दर्जाचे ब्लूटूथ हँडसेट, हेडफोन आणि मोबाइल अक्सेसरीस उपलब्ध आहे. सोलो डान्स स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आणि विजेत्या स्पर्धकांचे प्रमाणपत्र नवजीवन मोबाइल्स ॲण्ड स्टेशनरी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कराड रोड, विटा येथे मिळणार आहेत. स्पर्धेच्या ठिकाणी देण्यात आलेला पास दाखवून प्रमाणपत्र घेऊन जावे.
फोटो-१८विटा१