जागा खरेदी नसताना कुपवाड ड्रेनेजचा प्रस्ताव कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:49 IST2021-03-04T04:49:19+5:302021-03-04T04:49:19+5:30

सांगली : महापालिकेत सत्ताबदल झाल्यानंतर महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना कामाची चांगलीच घाई झाली आहे. कुपवाड ड्रेनेज योजनेचे सर्वेक्षण अजून ...

How to propose Kupwad drainage when space is not purchased? | जागा खरेदी नसताना कुपवाड ड्रेनेजचा प्रस्ताव कसा?

जागा खरेदी नसताना कुपवाड ड्रेनेजचा प्रस्ताव कसा?

सांगली : महापालिकेत सत्ताबदल झाल्यानंतर महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना कामाची चांगलीच घाई झाली आहे. कुपवाड ड्रेनेज योजनेचे सर्वेक्षण अजून झालेले नाही. ऑक्सिडेशन पाँडसाठीची जागा खरेदी नाही. तरीही ड्रेनेज योजनेचा प्रस्ताव रेटला जात आहे, असा टोला भाजपचे गटनेते विनायक सिंहासने व नगरसेवक गजानन मगदूम यांनी लगाविला.

ते म्हणाले की, कुपवाड ड्रेनेज योजना गरजेची आहे. मात्र सर्वेक्षण, ‘डीपीआर’, जागा खरेदी नसताना प्रस्तावांबाबत महापौरांची सुरू असलेली घाई ही केवळ सत्ताबदल दाखविण्यापुरती नको. प्रभावी नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणी गरजेची आहे. या क्षेत्रातील सर्व नगरसेवकांना विश्‍वासात घेऊन सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. योजनेचा ‘डीपीआर’ तातडीने तयार झाला पाहिजे. सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी जागेची खरेदी करावी लागणार आहे. ते गतीने होणे गरजेचे आहे. मात्र त्यामध्ये गती दिसत नाही.

मगदूम म्हणाले, कुपवाड ड्रेनेज योजनेचे सर्व भागात सर्वेक्षण झालेले नसताना, ७० किलोमीटर पाईपलाईनची लांबी वाढणार, हे कशावरून निश्‍चित केले? कदाचित ही लांबी आणखी वाढूही शकते. सर्वच भागांचा या योजनेत समावेश झाला पाहिजे. कुपवाड ड्रेनेज योजना झाली पाहिजे; पण त्यात उथळपणा असता कामा नये. सांगली आणि मिरज ड्रेनेज योजनेप्रमाणे ती रखडू नये.

Web Title: How to propose Kupwad drainage when space is not purchased?