शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Municipal Election 2026: मिरजेची दुर्दशा किती दिवस सहन करणार, विनय कोरे यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 17:36 IST

मिरजेत औद्योगिक विकास झाला नाही

मिरज : जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाध्यक्ष आमदार विनय कोरे यांची प्रचार सभा मिरजेत पार पडली. जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार निवडून दिल्यास, १५ ते २० वर्षांपासून रखडलेली सर्व कामे दीड वर्षाच्या कालावधीत पूर्ण करण्याचे आश्वासन आमदार कोरे यांनी दिले.यावेळी आमदार कोरे म्हणाले की, मिरज शहरातील अनेक मूलभूत प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. वखार भागातील ड्रेनेजचे काम २० वर्षांत पूर्ण झालेले नाही. १५ ते २० वर्षे कामे रखडूनही येथील नगरसेवक पुन्हा निवडणुकीत सहभागी होतात, हे आश्चर्यकारक आहे. मिरजेची जनता शहराची झालेली दुर्दशा किती दिवस सहन करणार? शहराच्या दुरवस्थेला जबाबदार असणाऱ्यांना यावेळी दूर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

वाचा : कवलापूर विमानतळ, रिंग रोड अन् आयटी पार्कसह विकासकामांचा संकल्प; भाजपकडून जाहीरनामा प्रसिद्ध

ते म्हणाले की, आरोग्य पंढरी म्हणून ओळख असलेले मिरज शहर आपले वैभव जपण्यात अपयशी ठरले आहे. शहरातील ड्रेनेज व इतर कामे अपूर्ण असतानाही तीच माणसे पुन्हा मते मागण्यासाठी येतात. आपल्या जन्मभूमीची ससेहोलपट किती दिवस पाहणार, असा सवालही त्यांनी केला.प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जनसुराज्य शक्ती पक्ष कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. पंकज म्हेत्रे, महादेव कुरणे, अमर पाटील, अशोकराव माने, संभाजी मेंढे, जयश्री कुरणे, बाळासाहेब कौलापुरे, शांतनू सगरे, डॉ. चंद्रकांत पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.मिरजेत औद्योगिक विकास झाला नाहीमिरजेसारख्या शहरात १५ ते २० वर्षे कामे होत नाहीत, हे दुर्दैवी आहे. सत्तेत नसतानाही आपण मिरजेत ३ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी आणला. शहरात कामे रखडवणाऱ्या व्यवस्थेबद्दलची भावना मतपेटीतून व्यक्त करण्याची हीच वेळ असल्याचे त्यांनी सांगितले. मिशन हॉस्पिटल, मिरज दूध डेअरी बंद अवस्थेत असल्याकडे आणि रेल्वे जंक्शन असूनही औद्योगिक विकास होत नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

English
हिंदी सारांश
Web Title : Vinay Kore questions Miraj's plight, demands action now.

Web Summary : Vinay Kore criticized Miraj's stalled development, citing drainage issues and lack of industrial progress. He promised completion of pending projects within 1.5 years if his party's candidates are elected, urging voters to hold those responsible accountable.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक २०२६SangliसांगलीMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Vinay Koreविनय कोरे