सुरक्षेची हमी नसताना अंगणवाडी सेविकांनी काम कसे करायचे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:25 IST2021-05-01T04:25:38+5:302021-05-01T04:25:38+5:30

अध्यक्ष अतुल दिघे, कार्याध्यक्ष राजेंद्र बावके, सचिव सुवर्णा तळेकर, उपाध्यक्ष जीवन सुरुडे यांनी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर ...

How do Anganwadi workers work when security is not guaranteed? | सुरक्षेची हमी नसताना अंगणवाडी सेविकांनी काम कसे करायचे ?

सुरक्षेची हमी नसताना अंगणवाडी सेविकांनी काम कसे करायचे ?

अध्यक्ष अतुल दिघे, कार्याध्यक्ष राजेंद्र बावके, सचिव सुवर्णा तळेकर, उपाध्यक्ष जीवन सुरुडे यांनी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना पत्र पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, कोरोनाचे काम करताना सेविकाचा मृत्यू झाल्यास ५० लाखांची भरपाई देण्याचा शासनाचा निर्णय आहे, पण गेल्या वर्षभरात मरण पावलेल्या सेविकांच्या कुटुंबीयांना ती अद्याप मिळालेली नाही. सेविका कोरोनाने आजारी पडल्यास वैद्यकीय खर्चासाठी मदतही जाहीर केलेली नाही. कोरोनाबाधित सेविकांसाठी प्रत्येक कोरोना रुग्णालयात दोन बेड राखीव ठेवण्याचे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने मान्य केले होते, तसा दिलासा अन्य जिल्ह्यांत नाही. त्याबाबतचा निर्णय शासनाने जाहीर करावा.

संघटनेने मागणी केली की, गेल्यावर्षी कोरोनाची कामे करणाऱ्या सेविकांना पहिल्या महिन्यात एक हजार रुपयांचे अतिरिक्त मानधन मिळाले होते, ते दर महिन्याला मिळावे. थकीत मानधनही त्वरित द्यावे.

Web Title: How do Anganwadi workers work when security is not guaranteed?