सांगलीत घर फोडून ५० हजारांचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:36 IST2020-12-30T04:36:39+5:302020-12-30T04:36:39+5:30

सांगली : शहरातील सिध्दार्थ परिसरातील बंद घर चोरट्यांनी फोडून रोख ३२ हजार रुपयांसह दागिने असा ५० हजार रुपयांचा मुद्देमाल ...

A house in Sangli was burglarized and goods worth Rs 50,000 were seized | सांगलीत घर फोडून ५० हजारांचा मुद्देमाल लंपास

सांगलीत घर फोडून ५० हजारांचा मुद्देमाल लंपास

सांगली : शहरातील सिध्दार्थ परिसरातील बंद घर चोरट्यांनी फोडून रोख ३२ हजार रुपयांसह दागिने असा ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी विश्वास विलास कुदळे (वय ४५, रा. गावभाग, सिध्दार्थ परिसर, सांगली) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, रविवारी ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी कुदळे हे रविवारी कुटुंबासह विवाह कार्यक्रमासाठी मिणचे (ता. हातकणंगले) येथे गेले होते. रात्री ९ वाजण्याच्यासुमारास कुदळे कुटुंबीय घरी परतले. यावेळी त्यांना घराचा दरवाजा तुटल्याचे लक्षात आले. घरात चोरट्यांनी घरातील साहित्य विस्कटले होते, तर लोखंडी कपाट तोडून त्यात ठेवलेली ३२ हजार रुपयांची रोकड, १ ग्रॅम सोन्याची अंगठी, ३ ग्रॅमची सोनसाखळी, चांदीचा करदोडा असा सुमारे ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. शहर पोलिसात घटनेची नोंद असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: A house in Sangli was burglarized and goods worth Rs 50,000 were seized