शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात १६ मे पासून घरगणनेस प्रारंभ, जनगणना कधी होणार.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 15:34 IST

पाच हजारांवर प्रगणक नियुक्त : प्रशासन प्रथमच ‘डिजिटल’चा वापर करणार

सांगली : देशातील सर्वात मोठा प्रशासकीय उपक्रम मानली जाणारी जनगणना आता पूर्णपणे डिजिटल पद्धतीने राबविण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. जिल्ह्यात दि. १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत घरगणना मोहीम राबविण्यात येणार आहे.त्यानंतर फेब्रुवारी २०२७ मध्ये प्रत्यक्ष जनगणना पार पडणार आहे. यंदाच्या जनगणनेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात होणार आहे. यासाठी जिल्ह्यात तब्बल पाच हजार १२४ प्रगणक व पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.ग्रामीण भागात तहसीलदार, तर शहरी भागात मुख्याधिकारी जनगणना अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. जिल्हाधिकारी हे प्रधान जनगणना अधिकारी, तर निवासी उपजिल्हाधिकारी जिल्हा जनगणना अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

जनगणना २०२७ दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात घरयादी व घरगणना होईल. यादरम्यान प्रगणक प्रत्यक्ष घरोघरी जाऊन माहिती संकलित करतील. शासनाने निश्चित केलेले ३४ प्रश्न घरातील प्रमुख व्यक्तीकडून विचारून ही माहिती ‘एचएलओ’ ॲपच्या माध्यमातून थेट जनगणना पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे. विशेष म्हणजे, १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना census.gov.in/se या संकेतस्थळावर स्वतःहून माहिती भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.दुसऱ्या टप्प्यात १ ते २८ फेब्रुवारी २०२७ दरम्यान प्रत्यक्ष लोकसंख्या मोजणी केली जाईल. या प्रक्रियेसाठी प्रशासनाने आधीच तयारी सुरू केली असून, ४ ते ६ मार्च २०२६ दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र जनगणना संचालनालयातील सहायक संचालक कविता गोडबोले व प्रणय कुडकर यांनी मार्गदर्शन केले.

पायाभूत सुविधा उभारणीसाठी जनगणना महत्त्वाचीजनगणना ही केवळ आकडेवारी नसून, विकासाचा पाया मानली जाते. लोकसंख्येची सामाजिक, आर्थिक व लोकसंख्याशास्त्रीय माहिती यामधून उपलब्ध होणार आहे. या आकडेवारीच्या आधारे केंद्र व राज्य सरकारांना विकास योजना आखणे, संसाधनांचे योग्य वाटप करणे आणि पायाभूत सुविधा उभारणीसाठी अचूक नियोजन करणे शक्य होणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Census: House Listing Starts May 16, Census in 2027

Web Summary : Sangli district prepares for digital census. House listing begins May 16, 2026, followed by the census in February 2027. Five thousand enumerators are appointed. Citizens can self-report data online May 1-15, 2026. Census data is crucial for development planning.