हॉटेल व्यावसायिकांना वेळ वाढवून द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:26 IST2021-04-04T04:26:24+5:302021-04-04T04:26:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनामुळे लागू केलेल्या जमावबंदीमुळे हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यांना व्यवसायासाठी वेळ वाढवून ...

Hoteliers should be given more time | हॉटेल व्यावसायिकांना वेळ वाढवून द्यावी

हॉटेल व्यावसायिकांना वेळ वाढवून द्यावी

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोनामुळे लागू केलेल्या जमावबंदीमुळे हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यांना व्यवसायासाठी वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सरकारने जमावबंदीसह काही निर्बंध लागू केले आहेत. परंतु, या निर्बंधांमुळे शहरातील हॉटेल व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. त्याकरिता व्यवसायाची वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी सांगली जिल्हा खाद्य विक्रेता मालक-चालक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पृथ्वीराज पाटील यांच्याकडे केली. त्यानुसार पाटील यांनी मुंबईत मंत्री वडेट्टीवार यांची भेट घेतली आणि या व्यावसायिकांच्या तसेच नागरिकांच्या अडचणींबाबत चर्चा केली.

हॉटेल व्यवसायात मोठ्या प्रमाणात कामगार आहेत, त्यांना पगार द्यावा लागतो, बँकांची कर्जे काढून हा व्यवसाय चालवला जातो, त्यामुळे खूप मोठे नुकसान सोसावे लागत आहे. व्यवसायासाठी सध्याचा वेळ फारच अपुरा आहे. त्यामुळे तो वाढवून दिला पाहिजे, असे पाटील यांनी वडेट्टीवार यांना सांगितले. वडेट्टीवार यांनी यावर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Hoteliers should be given more time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.