शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
3
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
4
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
5
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
6
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
7
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
8
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
11
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
13
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
14
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
15
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
16
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
17
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
18
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
19
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
20
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 

परवानगीनंतरही हॉटेल चालकांचा दारू विक्रीस नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 19:30 IST

मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी त्यास परवानगी देताना, त्यांना छापील किमतीत विक्री करण्याचे बंधन घातले आहे. त्यामुळे अशी विक्री परवडणारी नसल्याचे स्पष्ट करीत, परमीट रुम व बिअरबार चालकांनी नकार दिला आहे.

ठळक मुद्देछापील किमतीचे बंधन : दुकानांपेक्षा जादा करांचा भार

सांगली : राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी राज्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य सर्व ठिकाणच्या परमीट रुम, बिअरबारमधील मद्यसाठा विक्रीस परवानगी दिली. मात्र छापील किमतीतच त्याची विक्री करण्याचे बंधन घातले असून, त्यांना लागू असलेले सर्व करही भरण्यास सांगितले आहे. त्यामुळे छापील किमतीत दारुविक्री करणे परवडणारे नसल्याने चालकांनी त्यास नकार दिला आहे.

सांगलीसह राज्यातील सर्व ठिकाणचे परमीट रुम व बार चालकांनी याबाबत असमर्थता दर्शविली आहे. वाईन शॉप व बिअर शॉपींना ठराविक कर लागू आहेत, मात्र परमीट रुम व बार चालकांना अन्य करही भरावे लागतात. त्यामुळे हॉटेल्समधील दारु जादा दराने त्यांना विकावी लागते. लॉकडाऊन काळात हा साठा संपविण्यासाठी चालकांनी शासनाकडे त्याच्या विक्रीची परवानगी मागितली होती. मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी त्यास परवानगी देताना, त्यांना छापील किमतीत विक्री करण्याचे बंधन घातले आहे. त्यामुळे अशी विक्री परवडणारी नसल्याचे स्पष्ट करीत, परमीट रुम व बिअरबार चालकांनी नकार दिला आहे.

राज्यात सर्वच परवानाधारक हॉटेल्समधील साठा मोठा आहे. बिअरची खरेदी मार्चमध्ये करण्यात आली होती. अनेकांकडील बिअर साठा मुदतबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे हॉटेलचालक चिंतेत सापडले आहेत. सांगलीत बुधवारी खाद्यपेय विक्रेता मालक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून, अशा विक्रीस नापसंती दर्शविली. राज्यभरातील परवानाधारक हॉटेलचालकही यास तयार नसल्याचे चित्र आहे. छापील किमतीत विक्री केल्यास हॉटेलचालकांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. केवळ विक्रीसाठी हॉटेलसाठी लागू असलेले सर्व कर त्यांना भरावे लागणार आहेत.शॉपइतकेच कर घेण्याची मागणीवाईन शॉपपेक्षा अधिकचे कर रद्द केल्यास हॉटेलचालकांना मद्यविक्री छापील किमतीत करणे परवडणारे ठरेल, अन्यथा यापूर्वी हॉटेलचालक ज्या दरात ग्राहकांना मद्यविक्री करीत होते, त्या दरात विक्री करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी खाद्य-पेय विक्रेता मालक संघाने केली आहे.

टॅग्स :hotelहॉटेलGovernmentसरकारSangliसांगली