शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: वसतीगृह अधीक्षकाने अल्पवयीन विद्यार्थ्यांना केली अमानुष मारहाण, विद्यार्थ्यांकडून आत्महत्येचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 13:37 IST

तर रेक्टर आम्हाला आणखी मारतील, तुम्ही जर आजच्या आज आम्हाला इथून घेऊन गेला नाही, तर जिवाचं काहीतरी करुन घेऊ

दत्ता पाटील

तासगाव : शाळेच्या नावावर हॉटेलमधून चहा आणला या रागातून शहरातील एका विद्यालयाच्या वसतीगृहातील अधीक्षकाने अल्पवयीन विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना समजल्यावर पालक वसतीगृहात येऊन विद्यार्थ्यांना घरी घेऊन गेले. या दोनही विद्यार्थ्यांवर गावातील एका दवाखान्यात उपचार सुरु आहेत. संबंधित रेक्टरवर कारवाई करण्याची मागणी आमदार सुमनताई पाटील यांनी  व्यवस्थापनाकडे केली आहे.सांगोला तालुक्यातील जुजारपूर या गावचे जितेंद्र दरीनाथ बजबळे आणि बालाजी दरीनाथ बजबळे हे जुळे भाऊ तासगाव शहरातील एका मोठ्या विद्यामंदिरात सहावीच्या वर्गात शिकायला आहेत. दोघे भाऊ विद्यामंदीराच्या वसतीगृहात राहतात. रविवारी (दि.२९ जानेवारी) सकाळी वसतीगृहातील विद्यार्थी  बाहेर जाऊन चहा घेऊन आले होते. त्या सर्वांनी वसतीगृहामध्ये चहा घेतला. हे निदर्शनास येताच शिपायाने त्या विद्यार्थ्यांना मारहाण केली. नंतर वसतीगृहाच्या अधीक्षकाने प्लंबिंग पाईपने या दोन जुळ्या भावांसह चार विद्यार्थ्यांना अमानुषपणे बदडून काढले.मारहाणीमुळे घाबरलेल्या बालाजी बजबळे या विद्यार्थ्याने एका शिक्षिकेचा मोबाईल घेऊन घरी वडिलांना सर्व प्रकार सांगितला. यानंतर त्याचे वडील तासगाव येथील वसतीगृहात येऊन दोन मुलांना घरी घेऊन गेले आहेत. त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरु आहेत.दरम्यान आमदार सुमनताई पाटील यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित संस्था व्यवस्थापकांना फोन करून वसतीग्रह अधीक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.विद्यार्थ्यांकडून आत्महत्येचा इशाराबालाजी बजबळे या विद्यार्थ्यांने वडिलांना फोन करून मारहाणीची माहिती दिली. त्यावेळी वडिलांनी याबाबत शिक्षकांना जाब विचारु का असे विचारले होते, परंतु विद्यार्थ्यांने ठाम नकार दिला. तुम्ही शाळेत विचारणा कराल तर रेक्टर आम्हाला आणखी मारतील, तुम्ही जर आजच्या आज आम्हाला इथून घेऊन गेला नाही, तर जिवाचं काहीतरी करुन घेऊ असा इशारा त्यांनी दिला होता. त्यामुळेच वडील तात्काळ येऊन त्यांना घरी घेऊन गेले आहेत. 

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी