शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा परिषदेत वसतिगृह कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 15:12 IST

इस्लामपूर येथील व्ही. एस. नेर्लेकर मूकबधिर विद्यालयातील कारभाराची चौकशी करावी, तसेच याप्रकरणी प्रशासनाकडून कारवाईला टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ विद्यालयाचे कर्मचारी जयवंत जाधव यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. विद्यालयामधील मूकबधिर विद्यार्थ्यांचे शोषण केले जात असून याची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.

ठळक मुद्देवसतिगृह कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्नचौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी

सांगली : इस्लामपूर येथील व्ही. एस. नेर्लेकर मूकबधिर विद्यालयातील कारभाराची चौकशी करावी, तसेच याप्रकरणी प्रशासनाकडून कारवाईला टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ विद्यालयाचे कर्मचारी जयवंत जाधव यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. विद्यालयामधील मूकबधिर विद्यार्थ्यांचे शोषण केले जात असून याची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.आंदोलनाबाबत निवेदनात म्हटले आहे की, मूकबधिर विद्यालयाच्या संस्थेचे सचिव अभिमन्यू रानमाळे, खजिनदार शोभाताई रानमाळे, वसतिगृह अधीक्षिका सुरेखा चव्हाण, मुख्याध्यापिका मनीषा शिंदे, पांडुरंग दाडमोडे यांच्याकडून संस्थेत गैरकारभार सुरू आहे. यापूर्वी याबाबत चौकशीची मागणी केल्यानंतर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तपासणी पथकाने चौकशी केली. यात संस्थाचालक, संस्था दोषी असल्याचे स्पष्ट होऊनही दोषींवर कारवाई करण्यात येत नाही.याच मागणीसाठी गुरुवारी मूकबधिर शाळेचे कर्मचारी जाधव यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. जाधव यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न करताच, पोलिसांनी त्यांना प्रतिबंध केला. यावेळी झटापटही झाली.यावेळी जयश्री पाटील, शशिकला माने, रुपाली जाधव, गंगुबाई कांबळे, रेश्मा कांबळे आदी उपस्थित होत्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली