शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेतील शंभर कोटींच्या रस्त्याचे घोडे पुन्हा अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 23:48 IST

मिरजेत रस्ता दुरुस्तीकरिता वारंवारच्या आंदोलनांमुळे शिवाजी रस्त्याचे केवळ पॅचवर्कचे काम करण्यात आले. मात्र तांत्रिक मंजुरीअभावी १०० कोटी खर्चाच्या या रस्त्याचे नूतनीकरण रखडण्याची चिन्हे

ठळक मुद्देतांत्रिक मंजुरीचा प्रश्न : शिवाजी रस्त्याचे केवळ पॅचवर्क सुरू

मिरज : मिरजेत रस्ता दुरुस्तीकरिता वारंवारच्या आंदोलनांमुळे शिवाजी रस्त्याचे केवळ पॅचवर्कचे काम करण्यात आले. मात्र तांत्रिक मंजुरीअभावी १०० कोटी खर्चाच्या या रस्त्याचे नूतनीकरण रखडण्याची चिन्हे आहेत. परिणामी रस्त्याचा शंभर कोटीचा खर्च निवडणूक आचारसंहितेत अडकण्याची शक्यता आहे.

मिरजेतील तानंग फाटा ते म्हैसाळ रेल्वे उड्डाण पुलापर्यंतचा रस्ता शंभर कोटी रुपये खर्च करून नव्याने करण्याची घोषणा लोकप्रतिनिधींनी केली होती. प्रत्यक्षात यापैकी शिवाजी रस्त्याचे केवळ पॅचवर्क करण्यात आले. मंत्र्यांच्या दौऱ्यासाठी रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी करणाºया प्रशासनाने १०० कोटीच्या रस्ते कामाचा तपशील जाहीर करावा, अशी मागणी काँग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवक करीत आहेत.शिवाजी रस्त्याचे वर्षभर रखडलेले काम सुरु करण्यासाठी उपोषण व आंदोलनांमुळे या रस्त्याचे पॅचवर्क करण्यात आले. शहरातील या प्रमुख रस्त्याच्या डांबरीकरणाची घोषणा करुन, तात्पुरती मलमपट्टी केल्याबाबत विरोधक टीका करीत आहेत.

रस्त्याची किरकोळ दुरुस्ती करण्यात आली असून आराखड्याप्रमाणे या रस्त्याचे डांबरीकरण व सुशोभिकरण करण्याची मागणी होत आहे.शिवाजी रस्त्यावर मोठ्या खड्ड्यामुळे वर्षभर अनेक अपघात झाल्यानंतरही प्रशासनाला जाग आली नाही. शहरातील या प्रमुख रस्त्याच्या दुरुस्तीसाठी विविध राजकीय पक्ष, संघटनांच्या पदाधिकाºयांनी प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलन करून रस्त्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. या दबावामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप आहे. शंभर कोटी खर्चाची घोषणा करुन, रस्त्याची केवळ दुरुस्ती केल्याचा विरोधकांचा आक्षेप आहे.मंजुरीची प्रतीक्षाराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एस. के. कदम यांनी, मिरजेतील शंभर कोटींच्या रस्तेकामाबाबत त्रुटी असल्याने हे काम सुरू होण्याबाबत दिल्लीतून मंजुरीची प्रतीक्षा सुरू असल्याचे सांगितले. सुमारे दहा किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम कधी सुरू होईल, याबाबत निश्चित सांगता येत नसल्याचेही ते म्हणाले. 

दिल्लीला जाणार : खाडेरस्त्याच्या तांत्रिक मंजुरीतील त्रुटी दूर करण्यासाठी स्वत: दिल्लीला जाणार असल्याचे आमदार सुरेश खाडे यांनी सांगितले. निवडणूक आचारसंहितेपूर्वी रस्त्याचे काम सुरू होण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीroad safetyरस्ते सुरक्षाfundsनिधी