सांगलीत आज होड्यांच्या शर्यती

By Admin | Updated: September 20, 2015 23:23 IST2015-09-20T23:12:17+5:302015-09-20T23:23:14+5:30

दुपारी चार वाजता सांगलीवाडी येथील शंकर घाटावरून स्पर्धेस प्रारंभ होईल.

Horse race in Sangli today | सांगलीत आज होड्यांच्या शर्यती

सांगलीत आज होड्यांच्या शर्यती


सांगली : शिवकल्प ग्रुप आणि सांगली जिल्हा रोर्इंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांगलीत भव्य होड्यांच्या शर्यतींचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रताप जामदार व दत्ता पाटील यांनी दिली.
आज, सोमवारी दुपारी चार वाजता सांगलीवाडी येथील शंकर घाटावरून स्पर्धेस प्रारंभ होईल. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे सात, पाच व तीन हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे. कवठेपिरान येथील रोहित साळुंखे यांच्याकडून स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व होड्यांना पाचशे पाच रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येईल. तुकाराम चव्हाण यांच्याकडून सर्व विजेत्यांना स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे  उद्घाटन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड व माजी आ. दिनकर पाटील यांच्याहस्ते होणार आहे. उद्योजक मिलिंद पाटील, समित कदम, भरत देशमुख, विजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Horse race in Sangli today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.